अहमदाबाद : ब्रिटनचे (British) पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Prime Minister Boris Johnson) दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. गुरुवारी सकाळी ते गुजरातच्या (Gujarat) अहमदाबाद विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी सुरूवातीला त्यांनी साबरमती आश्रमात पोहोचून महात्मा गांधींच्या फोटोला पुष्पहार अर्पण केला तसेच चरखा फिरवून सूतही कापले. त्याचवेळी, आता पंतप्रधान जॉन्सन गुजरातमधील वडोदरा येथील हलोलमध्ये जेसीबी प्लांटचे उद्घाटन करताना दिसले. तर या उद्घाटनानंतर ते स्वतःला रोखू शकले नाहीत. तर ते सरळ जाऊन जेसीबीच्या ड्रायव्हर सीटवर बसले. त्यांनी ते सुरू करून बघीतलं आणि परत दरवाजावर उभं राहत हात हलवले. त्यामुळे आता घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्याचा आत्मविश्वास आणि आनंद यूजर्सना आवडला आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे गुरुवारी सकाळीच भारतात पोहोचले. अहमदाबाद विमानतळावर त्यांचे आगमन झाल्यानंतर जंगी स्वागत करण्यात आले. त्यांचे विमानतळावर राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी स्वागत केले. यावेळी अनेक मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते.
यानंतर आपल्या दौऱ्याची सुरूवात करताना त्यांनी साबरमती आश्रमात पोहोचून महात्मा गांधींचे दर्शन घेतले. तसेच फोटोला पुष्पहार अर्पण केला. त्याचबरोबर चरखा फिरवून सूतही कापले होता. यानंतर त्यांनी गुजरातमधील वडोदरा येथील हलोलमध्ये जेसीबी प्लांटचे उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल ही होते.
जेसीबीचे उद्धाटन केल्यानंतर पंतप्रधान बोरिस यांनी थेट पावले जेसीबीकडे वळवली आणि थेट ड्रायव्हर सीटचा ताबा घेतला. तसेच यानंतर त्यांनी त्याचा स्टाटर मारून तो सुरू करून बघीतला. यानंतर ते बाहेर येत दरवाजावर उभं राहत लोकांना अभिवादन केले. तसेच आपला हात उचलत आनंद व्यक्त केला. त्यामुळे आता घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्याचा आत्मविश्वास आणि आनंद यूजर्सना आवडला आहे.
#WATCH UK PM Boris Johnson along with Gujarat CM Bhupendra Patel visits JCB factory at Halol GIDC, Panchmahal in Gujarat
(Source: UK Pool) pic.twitter.com/Wki9PKAsDA
— ANI (@ANI) April 21, 2022