लखनऊ : कोरोना काळात प्रवाशांत झालेली कमी आणि घटलेला महसूल लक्षात घेता तिकीट खरेदीमध्ये सूट देण्याचा निर्णय उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) रेल्वे विभागाने (Railway Department) घेतला आहे. तिकिटांच्या किमतीत सूट दिल्यानंतर प्रवासी रेल्वेने प्रवास करण्याला प्राधान्य देतील असा यामागे उद्देश आहे. (The Railway Department in Uttar Pradesh has decided to give 10 percent discounts on tickets)
गोरखपूर-मुंबई, अहमदाबाद-सिकंदराबाद या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेंमध्ये बसण्यासाठी जागा नसते. तर बाकीच्या काही मार्गांवर रेल्वेमध्ये प्रवाशांची वानवा असते. अशी विषम स्थिती निर्माण झाल्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये रेल्वेच्या महसुलावर गंभीर परिणाम झाला आहे. रेल्वे बर्थ (railway berth) रिकामे असल्यामुळे ज्या रेल्वेंना प्रतिसाद कमी आहे, अशा रेल्वेच्या फेऱ्या रेल्वे विभागाकडून कमी केल्या जात आहेत. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी उत्तरप्रदेशमध्ये रेल्वे तिकिटामागे 10 टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेत प्रवाशांना रेल्वे तिकिटात 10 टक्क्यांनी सूट देण्यात आलेये. त्यासाठी काही अटी घालण्यात आलेल्या आहेत. या अटीनुसार कोणतीही रेल्वे स्थानकावरुन निघण्याच्या 4 तासांआगोदर रेल्वे बर्थ (railway berth) रिकामे असेल तर प्रवाशांना तिकिटामध्ये 10 टक्क्यांची सूट मिळेल. तसेच त्यासाठी रेल्वे निघण्याच्या अर्धा तास अगोदर प्रवाशांना तिकीट खरेदी करणे गरजेचे आहे.
उत्तर प्रदेशमधील गोरखधाम एक्स्प्रेस या रेल्वेसाठीमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा फायदा उचलता येणार आहे. या रेल्वेमध्ये सीट रिकामे असतील तर रेल्वे सुटण्याच्या अर्धा तास अगोदर तिकीट खरेदी केल्यास एसी फर्स्ट क्लास डब्यामधील 2760 रुपयांचे तिकीट 2500 रुपयांना मिळेल. तसेच एसी टू या रेल्वे डब्यात बसायचे असल्यास मूळ 1645 रुपयांचे तिकीट 1490 रुपयांना दिले जाईल. स्लीपर कोचने प्रवास करायचा असेल तर 445 रुपयांचे तिकीट 405 रुपयांत खरेदी करता येईल.
दरम्यान, रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या घटल्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये ही योजना राबवली जात आहे. रेल्वेचा महसूल वाढावा, त्यासाठी रेल्वे विभागाकडून ही योजना राबवली जात आहे.
#INDvsENG | टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी इंग्लंड संघाची घोषणा https://t.co/40qeHGGs4V #EnglandTourIndia | #EnglandCricketTeam | #TeamIndia | #ENGvsIND | #INDvsENG | #ViratKohli |
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 22, 2021
संबंधित बातम्या :
(The Railway Department in Uttar Pradesh has decided to give 10 percent discounts on tickets)