Jahangirpuri Encrochment Drive : दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये (Jahangirpuri) हनुमान जयंतीला हिंसाचार (Violence) झाला. यानंतर हाणामारीच्या ठिकाणचे अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाने बुलडोझर चालवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर निमलष्करी दलासह 1500 हून अधिक पोलिसांच्या मदतीने अवैध धंदे हटवण्यासाठी बुलडोझरचा वापर करण्यात आला. यादरम्यान कारवाई सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने जहांगीरपुरीतील एमसीडीच्या कारवाईला स्थगिती देत यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले. मात्र त्यानंतरही अधिकृत आदेश येईपर्यंत एमसीडीने तोडफोड सुरूच ठेवली होती. त्याविरोधात डाव्या नेत्या बृंदा करात (Brinda Karat) मैदानात उतरल्या. तसेच त्यांनी कायदा आणि संविधानावर बुलडोझर चालवण्यात आला. किमान सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) आणि त्याच्या आदेशांवर तरी जहांगीरपुरीत बुलडोझर चालवायला नको होता, असे म्हटले आहे.
जहांगीरपुरीमध्ये हनुमान जयंतीला हिंसाचार झाला. यानंतर हाणामारीच्या ठिकाणचे अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाने बुलडोझरची कारवाई सुरू केली. जहांगीर पुरीतील बेकायदा बांधकाम पाडण्याची तयारी करण्यात आली होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
At 10:45 am, the SC gave the order to maintain the status quo on the demolition drive, I have come here for the implementation of the order: CPIM leader Brinda Karat in Jahangirpuri pic.twitter.com/ZoMszwyl84
— ANI (@ANI) April 20, 2022
तर जहांगीरपुरी हिंसाचारग्रस्त भागात स्थानिक लोक आपले सामान काढताना दिसत होते. तर आपले साहित्य काढून कारवाई होण्याआधी दुसऱ्या ठिकाणी पाठवत होते. कारण त्या लोकांना कोणतीच नोटीस देण्यात आली नव्हती. त्यामुळे हे सगळं सुरू होतं. तर ज्यावर आपला उदरनिर्वाह चालतो तेच हटविण्यात येणार असल्याने लोक न्यायालयात गेले होते. मात्र येथील मशिदीजवळील अतिक्रमण हटविण्यात आली.
त्यानंतर हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. खरं तर, जमियत उलेमा-ए-हिंदने यूपी, मध्य प्रदेशातील हिंसाचाराच्या आरोपींच्या मालमत्ता पाडल्याच्या विरोधात याचिका दाखल केली होती. त्यात आज उलेमा-ए-हिंदने जहांगीरपुरीतील बुलडोझर कारवाईचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयासमोर मांडला. त्यात आता सीपीएम नेत्या बृंदा करात यांनी उडी घेतली.
Demolition drive has been stopped. I appeal to people of Jahangirpur to maintain peace & harmony & wait for SC’s next order. Demolition was against the Constitution. Special CP assured me that no demolition will take place in accordance with the SC order: CPIM leader Brinda Karat pic.twitter.com/grgSRnmYTm
— ANI (@ANI) April 20, 2022
यादरम्यान कारवाई सुरू असताना जहांगीरपुरीतील सीपीआय (एम) नेत्या वृंदा करात यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने सकाळी 10:45 वाजता अतिक्रमणविरोधी मोहिमेला यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असूनही, NDMC दिल्लीतील जहांगीरपुरी भागात अतिक्रमणविरोधी मोहीम सुरूच ठेवत आहे. यावेळी कायद्याची पायमल्ली करणाऱ्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या बुलडोझरला रोखण्यासाठी मी आल्याचे बृंदा करात म्हणाल्या.
यावेळी बृंदा करात म्हणाल्या की, मी जहांगीरपुरीच्या जनतेला एवढेच सांगेन की, सर्वांनी एकोपा आणि शांतता राखावी. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येथे बुलडोझर थांबला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशाची प्रतीक्षा करा.
पहा :
पहा :