नवी दिल्ली | 14 ऑगस्ट 2023 : प्रेमासाठी देशांच्या सीमापार करुन पाकिस्तानातून आपल्या चार मुलांसह आलेली सीमा हैदरने पाकिस्तानच्या स्वांतत्र्यदिनी चक्क पाकिस्तान मुर्दाबादचे नारे दिल्याने खळबळ उडाली आहे. तिचा एक कपाळावर वैष्णो देवीची चुनरी बांधत मुलांसह पाकिस्तान मुर्दाबाद आणि हिंदुस्थान झिंदाबाद म्हणतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे सीमावर देखील गदर-2 चित्रपटाचा फिव्हर चढला की काय असा सवाल केला जात आहे. सीमाने पंतप्रधानांनी केलेल्या विनंतीप्रमाणे हर घर तिरंगा अभियानात सहभाग घेतला आहे. सचिन आणि सीमा यांनी त्यांच्या नोएडातील घरावर भारताचा तिरंगा फडकवला आहे. या प्रसंगी सीमाचे केस लढविणारे वकील ए.पी.सिंह देखील हजर होते.
पाकिस्तानातून नेपाळ मार्गे भारतात सचिन मीणा याला भेटायला आलेली सीमा हैदर हीने आता भारतीय नागरिकता मिळण्यासाठी अर्ज केला आहे. तिने म्हटले आहे की आता जर आपण पाकिस्तानात गेलो तर आपले एक हाड शिल्लक राहणार नाही. सीमाने म्हटले आहे की आता तिने सचिन बरोबर लग्न केले आहे. आणि तिला इथेच रहायचे आहे. सचिन आणि त्याच्या आई-वडीलांनी तिला स्वीकारले आहे. कालचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात सीमा हैदर हीने पाकिस्तान मुर्दाबाद म्हणतानाच हिंदुस्थान झिंदाबाद म्हटले आहे. आणि मुलांनाही तेच बोलायला लावताना ती दिसत आहे. तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्य योगीनाथ यांचाही जयजयकार केला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून त्यास वारंवार पाहीले जात आहे.
सीमा हैदरचा हाच तो व्हिडीओ पाहा –
सीमा हैदर ने लगाया पाकिस्तान मुर्दाबाद के नारे। #SeemaHaider #SeemaSachin pic.twitter.com/Oa1rV9R3u6
— Jivesh Mishra (@JiveshK70492927) August 14, 2023
नोएडाच्या सचिनशी पब्जी खेळताना प्रेम जडल्याचे सीमा हैदरचे म्हणणे आहे. त्यानंतर ती आपल्या चार मुलांना घेऊन नेपाळ मार्गे भारतात दाखल झाली. नेपाळमध्ये तिने पशुपतीनाथ मंदिरात सचिन याच्याशी लग्नही केल्याचे म्हटले होते. नंतर मात्र पशुपतीनाथ मंदिराच्या पुजाऱ्याने येथे तर लग्न होतच नसल्याचे म्हटल्याने खळबळ उडाली आहे. सीमाची अनेक तपास यंत्रणामार्फत चौकशी झाली आहे. सीमा हीची चौकशी संपलेली नाही किंवा तिला क्लीन चीटही मिळालेली नाही. सीम हैदर हीला मध्यंतरी चित्रपटातून तसेच राजकारणातूनही ऑफर आली होती. त्यामुळे हे प्रकरण आता पुढे काय वळण घेते याकडे नजर लागली आहे.