नवी दिल्ली | 11 ऑगस्ट 2023 : देशाची पहिली वेगवान रेल्वे (Indian Railway) धावली. चाचणीत ती उत्तीर्ण झाली. त्यामुळे भारतात वेगवान प्रवासाचा नवीन अध्याय सुरु होणार आहे. रेल्वेतून झुकझुक नाही तर सुपरफास्ट प्रवास करता येईल. देशाच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकावर जाण्यासाठी दोन दिवसांचा लागणारा कालावधी अवघ्या काही तासांवर येईल. त्यादृष्टीने प्रयोग सुरु आहेत. देशाची पहिली रिजनल रॅपिड ट्रांझिट सिस्टम (RRTS) कॉरिडोर दिल्ली ते मेरठ या दरम्यान तयार करण्यात आले आहे. रॅपिडएक्स ट्रेनची (RAPIDX) चाचणी घेण्यात आली. ट्रायल रनमध्ये ही रेल्वे सुसाट धावली. तिने इच्छित स्थळ अवघ्या काही मिनिटात गाठले. यामुळे ही देशातील सर्वात वेगवान रेल्वे ठरली. या रेल्वेचा वेग किती आहे, तिने किती मिनिटात अंतर पार केले, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील नाही?
17 किलोमीटर इतक्या मिनिटात
साहिबाबाद ते दुहाई डिपोपर्यंत या रॅपिडएक्स रेल्वेने सुसाट धाव घेतली. 17 किलोमीटरचे अंतर या ट्रेनने अवघ्या 12 मिनिटात पुर्ण केले. या ट्रॅकवर रॅपिडएक्स ट्रेन प्रति तास 160 किलोमीटरने धावली. ही ट्रेन प्रति तास 180 किमीने धावू शकते. ही देशातील सर्वात वेगवान ट्रेन आहे. लवकरच साहिबाबाद-दुहाई सेक्शन जनतेसाठी सुरु करण्यात येण्याची शक्यता आहे.
ट्रायल रन सुरु
नॅशनल कॅपिटल रिजन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या (NCRTC) अधिकाऱ्याने रॅपिडएक्सच्या ट्रायलची माहिती दिली. त्यानुसार सकाळी 6 ते रात्री 11 वाजे दरम्यान या ट्रेनची ट्रायल सुरु आहे. प्रत्येक 15 मिनिटांसाठी ही रेल्वे चालविण्यात येते. त्यामुळे त्यातील तांत्रिक दोष समोर येतात. सुधारणा करण्याचा अंदाज येतो.
कधी होईल प्रकल्प पूर्ण
हा प्रकल्प 2025 पर्यंत पूर्ण करण्याची अपेक्षा आहे. दिल्ली-गाझियाबाद-मेरठ कॉरिडोर 82 किलोमीटर इतका लांब आहे. सर्वात वेगाने रॅपिडएक्स दिल्ली ते मेरठचे अंतर 60 मिनिटात कापेल. पण साहिदाबाद ते दुहाई डेपोपर्यंत प्रायोरिटी सेक्शन लवकर पूर्ण करण्यात येईल आणि ते सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यात येतील. 17 किमी लांब या सेक्शनमध्ये पाच स्टेशन असतील. साहिबाबाद, गाझियाबाद, गुलधर, दुहाई आणि दुहाई डिपो ही ती स्थानकं आहेत.
कुठे कुठे तयार होत आहे कॉरिडोर