जगातील पहिले 3 डी प्रिंटेड मंदिर येथे झालं तयार, पहा काय आहेत वैशिष्ट्ये

| Updated on: Nov 23, 2023 | 6:54 PM

सिंपलीफोर्ज या संस्थेने स्थानिक सामुग्रीच्या मदतीने आणि सॉफ्टवेअर प्रणालीचा वापर करून साईटवर तीन गर्भगृह आणि कळसाचा थ्रीडी प्रिंट तयार करण्यासाठी रोबोटिक्स 3 डी प्रिटींग सुविधेचा वापर करण्यात आला आहे. इतर भागांना तयार करण्यासाठी इतर पारंपारिक तंत्राचा वापर केला.

जगातील पहिले 3 डी प्रिंटेड मंदिर येथे झालं तयार, पहा काय आहेत वैशिष्ट्ये
3D PRINTED TEMPLE
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

तेलंगणा | 23 नोव्हेंबर 2023 : तुम्ही थ्रीडी प्रिंटेड पोस्ट ऑफीस पाहीलं असेल परंतू आता थ्रीडी प्रिंटेड मंदिर तयार करण्यात आले आहे. तेलंगणातील या अनोख्या थ्रीडी प्रिंटेड मंदिराला तयार करायला तीन महिन्यांचा कालावधी लागला आहे. जगातील हे पहिलेच थ्रीडी प्रिंटेड मंदिर असून तेलंगणाच्या सिद्दीपेटमध्ये नुकतेच या मंदिराचे अनावरण करण्यात आले. या मंदिराची निर्मिती हैदराबाद येथील अप्सुजा इंफ्राटेकने सिंपलीफोर्ज क्रिएशंन्सच्या सहकार्याने केली आहे. या मंदिराचे तीन भाग आहे. 4,000 चौरस फूट क्षेत्रात 35.5 फूटाचे बांधकाम करण्यात आले आहे. यात तीन गर्भगृह आहेत. देवी पार्वती साठी कमळाच्या आकाराचे गर्भगृह, भगवान शंकरासाठी एक चौकोनी शिवालय आणि गणेशासाठी एक सुंदर मोदक तयार करण्यात आला आहे.

सिंपलीफोर्ज या संस्थेने स्थानिक सामुग्रीच्या मदतीने आणि सॉफ्टवेअर प्रणालीचा वापर करून साईटवर तीन गर्भगृह आणि कळसाचा थ्रीडी प्रिंट तयार करण्यासाठी रोबोटिक्स 3 डी प्रिटींग सुविधेचा वापर करण्यात आला आहे. इतर भागांना तयार करण्यासाठी इतर पारंपारिक तंत्राचा वापर केला. खांब, स्लॅब आणि फरशी या भागांचा त्यात समावेश आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधलेल्या मंदिराच्या बांधकामासाठी पाच महिने लागले.

जगातील पहिले थ्रीडी मंदिर

सिंपलीफोर्जचे मुख्य अधिकारी अमित घुले यांनी सांगितले की जगातील हे पहिले 3 डी प्रिंटेड मंदिर आहे. बांधकामसाईटवरील अनेक आव्हानांवर मात करून हे मंदिर तयार केले आहे. हे मंदिर दोन्ही पद्धतीने तयार केले आहे. सिंपलीफोर्स कोणत्याही परिसरातील आव्हाने पेलून अशाप्रकारचे बांधकाम करु शकते. जमीन ओबडधोबड असो की वाळवंटी प्रदेश किंवा बर्फाळ प्रदेश सिंपलीफोर्जने अशा क्षेत्रात बांधकाम करु शकते असे त्यांनी सांगितले आहे.