नवी दिल्ली | 6 ऑगस्ट 2023 : केंद्र सरकारने आपल्या एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता ( डीए ) तीन टक्क्यांनी वाढ करणार आहे. सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सध्या 42 टक्के महागाई भत्ता मिळतो. त्यात आता वाढ होऊन महागाई भत्ता 45 टक्के होणार आहे. महागाई निर्देशांकानूसार महागाई भत्त्यात वाढ केली जाते. यापूर्वी मार्चमध्ये केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली होती.
जून 2023 साठी औद्योगिक कामगार ग्राहक किंमत निर्देशांक ( सीपीआय-आयडब्ल्यू ) 31 जुलै 2023 रोजी जारी केला होता. आम्ही महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्याची मागणी केली आहे. परंतू सरकार महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करू शकते असे ऑल इंडीया रेल्वेमॅन फेडरेशनचे महासचिव शिव गोपाल मिश्रा यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. त्यामुळे महागाई भत्ता 42 टक्क्यांवरुन 45 टक्के होऊ शकतो असे ते म्हणाले. वित्तमंत्रालय डीएमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करणार आहे. अंतिम मंजूरीकरीता केंद्रीय मंत्रीमंडळासमोर सादर करेल. डीए वाढण्यासाठी 1 जुलै 2023 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल. डीएमध्ये अलिकडील वाढ 24 मार्च 2023 रोजी केली होती. आणि तो 1 जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आला होता.
मार्चमध्ये झाली होती वाढ
यापूर्वी मार्चमध्ये महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली होती. त्यावेळी 1 जानेवारीपासून डीएची भरपाई करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. तो 1 जुलै पासून लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे 2 महिन्यांची एरियर पण मिळणार आहे. डीएची वाढ सातव्या वेतन आयोगानूसार मिळत आहे. जुन्या वेतन आयोगानूसार वेतन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना डीएचची वाढ वेगळी असणार आहे.