संदिप राजगोळकर, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली : आज नवीन संसदेत तरुणांनी धुडगूस घातला. तानाशाही नही चलेगी अशा घोषणा यातील दोन तरुणांनी दिल्या. संसदेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी उड्या मारल्या. त्यांनी लोकसभा सभागृहात लक्ष वेधण्यासाठी स्मोक कॅडलचा वापर केला. त्यामुळे सभागृहात पिवळा धूर पसरला. त्यामुळे नाकाला झिणझिण्या आल्याचे खासदारांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. कामकाज सुरु असतानाच या तरुणांनी संसदेच्या आत आणि बाहेर गोंधळ घातला. ही सुरक्षा व्यवस्थेतील घोडचूक असल्याचे समोर येत आहे. आता प्रकरणी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मत मांडले.
ही चूक झाली
लोकसभेच्या या गोंधळानंतर काही काळासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. या चार तरुणांपैकी एक तरुणी आहे. प्राथमिक अहवालानुसार हा फक्त धूर होता पण चिंता करण्याचं कारण नाही. लोकसभेच्या सुरक्षेबाबत जी काही चूक झाली त्याबाबत पूर्णपणे चौकशी केली जाईल. यासंदर्भात दिल्ली पोलिसांनाही योग्य ते निर्देश देण्यात आले आहे. याप्रकरणात सखोल चौकशी करण्यात येईल असे आश्वासन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिले.
लातूरमधील तरुण ताब्यात
या प्रकरणात लातूरमधील अमोल शिंदे याला ताब्यात घेण्यात आलं आहे. संसदेच्या बाहेर निदर्शनं करणारी नीलम नावाची महिला पोलिसांच्या ताब्यात आहे. हरयाणातील महिला पोलिसांच्या ताब्यात आहे. ज्या लोकांनी गोंधळ घातला. ते मैसूरचे प्रतापराव सिंह खासदाराच्या पासवर हे लोक संसदेत आले होते. तर मध्यप्रदेशमधील खासदारांच्या मदतीने हे पास बनवण्यात आले होते. या प्रकरणाची आता आयबी टीमकडून चौकशी होत आहे. काही वेळासाठी संसदेचं कामकाज स्थगित केलं गेलं .