Visa Free entry for Indians : आपल्यापैकी अनेकांना फिरण्याची खूप आवड असते. पण बाहेर फिरायला जायचं म्हणजे सगळ्यात मोठा प्रश्न येतो तो व्हिसाचा. त्या देशाचा व्हिसा मिळाल्याशिवाय, तिथे एंट्री मिळत नाही. पण आता भारतीयांना फिरायला जाताना जास्त विचार करावा लागणार नाही, त्याचं कारण म्हणजे नुकतंच बऱ्याच देशांनी भारतातून प्रवास करणाऱ्यांसाठी Visa ची गरज बंद केली आहे. म्हणजेच जर तुम्हाला विविध ठिकाणी फिरायची आवड असेल आणि तुमच्याकडे भारतीय पासपोर्ट असले तर तुम्ही सहज विदेशवारी करू शकता.
व्हिसा मिळण्याचं टेन्शन न घेताच तुम्ही अनेक देश फिरून येऊ शकता. नुकतंच इराणने भारतीयांसाठी व्हिसा-फ्री प्रवासाची घोषणा केली. तर यापूर्वी थायलंडनेही भारतीय पासपोर्ट धारकांसाठी व्हिसाची गरज नसल्याचे स्पष्ट केले. 10 मे 2024 पर्यंत भारतीय पर्यटक थायलंडमध्ये 30 दिवसांसाठी व्हिसा फ्री प्रवास करू शकतात.
जगात असे अनेक देश आहेत, जिथे जाण्यासाठी भारतीयांना व्हिसाची गरज लागत नाही. श्रीलंकेनेही 31 मार्च 2024 पर्यंत भारतीयांसाठी व्हिसाची गरज नसल्याचे सांगितले. भारतातून जाणारे पर्यटक तिथे 30 दिवस विना व्हिसा राहू शकतात. मलेशियानेही भारतीयांसाठी 30 दिवसांपर्यंत व्हिसा फ्री ट्रॅव्हलची घोषणा केली. त्याशिवाय जगातील कोणत्याही देशातून केनिया येथे जाणाऱ्या पर्यटकालाही व्हिसा अप्रूव्हलची गरज नाही.
जगातील कोणत्या देशात भारतीयांना व्हिसाची गरज नाही ते जाणून घेऊया.
थायलंड, मलेशिया, केनिया, इराण, श्रीलंका , भूतान, कझाकिस्तान, हाँगकाँग, कुक आयलंड, फिजी, नेपाळ, मॉरिशस, सेनेगल, ट्यूनिशिया, माययक्रोनेशिया, नीयू (Niue), वानूआतू (Vanuatu), ओमान, कतार, बार्बाडोस, ब्रिटीश व्हर्जिन आयलंड, डोमिनिरका, ग्रेनाडा, हैती, जमैका, मॉन्टेसेराट, सेंट किट्स अँड नेव्हिस, सेंट विन्सेंट अँड द ग्रेनेडाइन्स त्रिनिदाद अँड टोबॅगो, अल सल्व्हाडोर, मकाऊ, गॅबॉन, मादागास्कर, रवांडा
याशिवाय असे अनेक देश आहेत जे भारतीयांसाठी व्हिसा ऑन-अरायव्हलची (visa on arrival) सुविधा ऑफर करतात. त्यामध्ये इंडोनेशिया मालदीव, टांझानिया, मार्शल आयलंड, जॉर्डन, कंबोडिया, म्यानमार यासह अनेक देशांचा समावेश आहे.