भाजपाच्या या नेत्याने कुटुंबियांसह केली आत्महत्या, असा आजार दुश्मनालाही होऊ नये असे ट्वीट करीत जीवन संपवले

| Updated on: Jan 28, 2023 | 8:03 AM

समाजमाध्यमावर पोस्ट पडताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घराचे कुलूप तोडून चारही जणांना रुग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी तपासून चौघांना मृत घोषीत केले.

भाजपाच्या या नेत्याने कुटुंबियांसह केली आत्महत्या, असा आजार दुश्मनालाही होऊ नये असे ट्वीट करीत जीवन संपवले
SUCIDE
Image Credit source: socialmedia
Follow us on

भोपाळ : आपल्या मुलांना झालेल्या एका दुर्मिळ आजाराने व्यतिथ झालेल्या भाजपाच्या एका स्थानिक नेत्याने दुश्मनालाही असा आजार होऊ नये अशी पोस्ट ट्वीटरवर टाकत कुटुंबियांसह जीवन संपवले आहे. पोलीसांनी घराचा दरवाजा तोडला तेव्हा पत्नी आणि दोन लहान मुले आणि संजीव मिश्रा निपचित पडल्याचे आढळले. त्यांना रूग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले.

मध्य प्रदेशातील विदीशा जिल्ह्यातील भाजपाचे माजी नगरसेवक संजीव मिश्रा ( 45) यांनी त्यांची पत्नी नीलम ( 42), आणि मुले अनमोल (13) आणि सार्थक ( 7 ) यांच्यासह काल आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्याचे पोलीसांनी सांगितले आहे. हे दाम्पत्य मुलांना झालेल्या एका दुर्मिळ आजाराने त्रस्त झाले होते. त्यांच्या दोन्ही लहान मुलांना डीएनडी हा जनेटीक आजार झाला होता.

संजीव यांनी आत्महत्या करण्यापूर्वी ट्वीटर या साईटवर एक पोस्ट टाकल्याचा दावा पोलीसांनी केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी देवा दुश्मनांच्या मुलांनाही असा आजार होऊ देऊ नकोस, मी माझ्या मुलांना वाचवू शकत नाही, त्यामुळे मी जगण्याचा अधिकारच नाही असे त्यानी पोस्ट केले होते. या प्रकरणी विदिशाच्या सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समाजमाध्यमावर पोस्ट पडताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घराचे कुलूप तोडून चारही जणांना रुग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी तपासून चौघांना मृत घोषीत केले. मिश्रा यांच्या मुलांना DMD जेनेटीक आजार झाला होता. त्यामुळे त्यांनी मेडीसीन खाऊन जीवन संपवले.
Duchenne muscular dystrophy (DMD) disorder 

ड्यूकेन मस्क्युलर डिस्ट्रॉफी (डीएमडी) हा एक अनुवांशिक विकार आहे जो स्नायूंच्या पेशींना अखंड ठेवण्यास मदत करणार्‍या डिस्ट्रोफिन नावाच्या प्रथिनाच्या बदलांमुळे होतो. त्यामुळे स्नायूंच्या पेशींचा ऱ्हास होतो आणि शरीर कमकुवत होते.