दिल्लीत सध्या घमासान सुरु आहे. सक्तवसुली संचालनालयाने(ED) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याने आपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी कालपासून विविध भागात प्रदर्शने केले. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आता होळी ही साजरी न करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आहे. लोकसभा निवडणूकच हायजॅक करण्यासाठी भाजप विरोधी गोटातील नेत्यांना टार्गेट करत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. आपचे कार्यकर्ते 26 मार्च रोजी पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालणार आहेत. आम आदमी पार्टीचे दिल्ली संयोजक गोपाल राय यांनी ही घोषणा केली. केजरीवाल यांना भेटू देण्यात येत नसल्याने आमदार, नगरसेवक, कार्यकर्ते नाराज झाले आहेत. अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात गुरुवारी ईडीने केजरीवाल यांना अटक केली.
शहिदी पार्कमध्ये येणार एकत्र
कार्यकर्ते, नेत्यांना पोलिसांनी दिवसभर ताब्यात ठेवले. केजरीवाल यांच्या अटकेने संताप व्यक्त होत आहे. शनिवारी सकाळी सर्व आमदार, आपचे पदाधिकारी, नगरसेवक, इंडिया ब्लॉकचे प्रतिनिधी या अटकेविरोधात एकत्र येतील. 23 मार्च रोजी भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांचा शहिद दिवस आहे. यादिवशी शहिदी पार्कमध्ये सर्व जण एकत्र येणार आहेत. त्यात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा पण समावेश असल्याचे गोपाल राय यांनी सांगितले.
पंतप्रधानांच्या घराला घेराव
पंतप्रधानांविरोधात आपच्या कार्यकर्त्यांमध्ये अत्याधिक रोष असल्याचे दिसून आले. भाजप दमनशाही, दडपशाहीचा वापर करत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. 24 मार्च मार्च रोजी आंदोलन अजून तीव्र करण्यात येणार आहे. 25 मार्च रोजी होळी साजरी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर 26 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यात येणार असल्याचे गोपाल राय यांनी स्पष्ट केले.
लवकरच संयुक्त आंदोलन