या पायलट लेकीने सर्वांची मने जिंकली, असे घेतले वडीलांचे आशीर्वाद

| Updated on: Jan 16, 2023 | 7:47 PM

सोशल मिडीयावर एक अत्यक भावूक व्हीडीओ व्हायरल झाला आहे. एका मुलीच्या तिच्या वडीलांवरील आदर आणि प्रेमाच्या या व्हीडीओला खूप पसंत केले जात आहे. हा व्हीडीओ पाहिल्यानंतर लोक या मुलीला आशीर्वाद देत आहेत.

या पायलट लेकीने सर्वांची मने जिंकली, असे घेतले वडीलांचे आशीर्वाद
PILOT
Image Credit source: PILOT
Follow us on

मुंबई : सोशल मिडीयावर व्हायरल झालेले काही व्हीडीओ अगदी ह्दयस्पर्शी असतात. काही आपल्याला हसायला लावून आपले मनोरंजन करतात तर काही व्हीडीओ आपल्याला आपली सांस्कृतिक परंपराची आठवण करून देत असतात. असाच एक मनाला भावणारा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. तो पाहून आपल्या अभिमान नक्कीच वाटेल काय आहे हा व्हीडीओ ते आपण पाहूया …

सोशल मिडीयावर एक व्हीडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हीडीयो मध्ये एका विमानातील दृश्य दिसत आहे. यात एक पायलट मुलगी आणि तिचे वडील दिसत आहेत. ही मुलगी उड्डाण करण्यापूर्वी वडीलांच्या पायाला स्पर्श करून त्यांचे कसे आशीर्वाद घेत असल्याचे आपण पाहू शकतो. हा पिता आपल्या कन्येचे स्वप्न पूर्ण झाल्याने आनंदीत झाला असून तिने अशाप्रकारे आशीर्वाद घेतल्याने तो धन्य झाल्याचे भाव त्याच्या चेहऱ्यावर पसरलेले आहेत. सोशल मीडियावर लोक या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत.

हा व्हीडीओ पाहिल्यानंतर लोक या मुलीला आशीर्वाद देत आहेत. ते हा व्हीडीओ पाहिल्यानंतर जाम खूप खूश आहेत. जगातील सर्व पालकांना त्यांच्या मुलांनी त्यांच्या आयुष्यात यशस्वी व्हावे असे वाटते. यासाठी आई- वडील खूप मेहनत घेत असतात. मुलंही आई-वडीलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत असतात. त्यांना आनंदी आणि खूष ठेवण्याचा प्रयत्न करतात. या व्हीडीओवर अनेकांच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

या व्हीडीयोला pilot_krutadnya नावाच्या यूजरने इंस्टाग्रामवर शेअर केले आहे,  त्याने त्यास कॅप्शनही दिले आहे. ही कॅप्शन वाचून लोक आनंदी होत आहेत आणि या पायलट लेकीला आशीर्वाद देत आहेत.या व्हीडीयोला 20 लाखाहून अधिक व्यूज़ मिळाले आहेत तर 5 लाखाहून अधिक लोकांनी लाइक्स केले आहेत.