मुंबई : यापूर्वी दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असताना (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा भर रस्त्यामध्ये थांबवावा लागला होता. कृषी विषयक कायद्यांचा निर्णय केंद्राने घेतल्याने शेतकऱ्यांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले होते. पण यावळी त्यांनी स्वत: आपला ताफा थांबवल्याची घटना घडली आहे. एका रुग्णवाहिकेला (Ambulance) रस्ता देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपल्या वाहनांचा ताफा थांबवला होता. मोदी हे गुजरातच्या (Gujrat) दौऱ्यावर आहेत. अहमदाबादहून ते गांधीनगरला जात असताना हा प्रसंग घडला होता. रुग्णवाहिका पुढे गेल्यावरच त्यांचा ताफाही पुढेही सरकला गेला.
रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करुन देण्यास प्राधान्य दिले जाते. असे प्रसंग आंदोलना दरम्यान किंवा वाहतुक कोंडीच्या वेळी अनेकवेळा घडले आहे. पण रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करुन देणे किती महत्वाचे असते हे या पंतप्रधानांच्या कृत्यामधून समोर आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदापबादहून गांधीनगरकडे मार्गस्थ होत होते. दरम्यान, पाठीमागून एक रुग्णवाहिके येत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लागलीच आपला ताफा बाजूला घेऊन थांबण्याचे सांगितले.
गुजरात दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी हे शुक्रवारी गांधीनगर-मुंबई या वंदे भारत एक्सप्रेसला ग्रीन सिग्नल देण्यासाठी दाखल झाले होते. त्यांच्या या कृत्याचे कौतुक सोशल मिडियावरही केले जात आहे.
गांधीनगर येथील रेल्वे स्टेशनवरुन त्यांनी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला हिरवा झेंडा तर दाखविलाच पण रेल्वेने प्रवासही केला. गांधीनगर ते अहमदाबाद असा तो प्रवास होता. यावेळी महिला उद्योजक, तरुण आणि विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांच्यासोबत प्रवासात होते.