नवी दिल्ली : देशात अशी काही रेल्वे स्थानके (Railway Station) आहेत. जिथे दोन राज्यांचा कारभार चालतो. एका राज्याच्या हद्दीतील तिकीट काऊंटरवरुन तिकीट खरेदी करायचं आणि दुसऱ्या राज्यात प्रवास करायचा असा हा सर्व मामला आहे. या अनोख्या रेल्वे स्टेशनला भेट देण्यासाठी काही प्रवाशी मुद्दामहून येतात. पण अनेकांना ही रेल्वे स्थानके कुठे आहेत, तेच माहिती नाही. या रेल्वेस्थानकाचे दोन प्लॅटफॉर्म (Two Platform) दोन राज्यांमध्ये आहेत. याठिकाणाहून दोन्ही राज्यासाठी तिकीट खरेदी करता येते आणि त्या त्या राज्यात प्रवास करता येतो. कोणती आहेत ही राज्य आणि कोणती आहेत ही रेल्वे स्टेशन..
रेल्वे स्टेशन कोणते
या स्टेशनचे नाव भवानी मंडी (Bhawani Mandi) आणि नवापुर रेलवे (Navapur) स्टेशन अशी आहेत. भवानी मंडी स्टेशन राजस्थानच्या झालावाडा जिल्ह्यात आहे. पण हे पूर्णपणे राजस्थानमधील रेल्वे स्टेशन नाही. या स्टेशनवरील तिकीट काऊंटवर मध्यप्रदेशमधील रेल्वे कर्मचारी असतो. तर तिकीट घेणारे प्रवाशी हे राजस्थानचे असतात. या स्टेशनचा उत्तरेतील भाग मध्य प्रदेश तर दक्षिणेतील भाग राजस्थानमध्ये आहे.
प्लॅटफॉर्मची स्थिती
या प्लॅटफॉर्मचा कोड BMW आहे. या ठिकाणू एकूण तीन प्लॅटफॉर्म आहे. हे स्टेशन पश्चिम मध्य रेल्वेतंर्गत येते. नवी दिल्ली-मुंबई मेन लाईनवर हे स्टेशन येते. स्वराज एक्सप्रेस, गोल्डन टेंम्पल एक्सप्रेस, पश्चिम एक्सप्रेस आणि सर्वोदय एक्सप्रेस अशा अनेक रेल्वे या स्टेशनवरुन जातात.
नवापूर रेल्वे स्टेशन
हे स्टेशन महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांदरम्यान आहे. या रेल्वे स्टेशनची लांबी 800 मीटर आहे. यातील 500 मीटर गुजरातकडे तर 300 मीटर महाराष्ट्र राज्यात येते. याठिकाणी 4 भाषांमध्ये उद्धघोषणा, अनाऊसमेंट करण्यात येते. गुजराती, मराठी, हिंदी आणि इंग्रजी. या रेल्वे स्टेशनवर पांढऱ्या रंगाने दोन राज्यांची सीमा दर्शविण्यात आली आहे. या स्टेशनवरील तिकीट घर आणि पोलीस स्टेशन महाराष्ट्रात आहे. तर स्टेशन मास्टरचे कार्यालय, वेटिंग रुम आणि वॉशरुम गुजरात राज्यात आहे. इतर ठिकाणी पण काही स्टेशन दोन राज्यात आहेत. पण तिथे दोन्ही बाजूने रेल्वे तिकीट विक्री केंद्र आणि इतर सुविधा पुरविल्या आहेत.
मुंबई विभागात रेल्वे स्टेशन
हे रेल्वे स्टेशन मुंबईच्या पश्चिम विभागात येते. या ठिकाणी तीन प्लॅटफॉर्म आहे. या स्टेशनचा कोड NWU आहे. या रेल्वे स्टेशनवरुन तुम्ही कोलकत्ता, अहमदाबाद, सुरत, वाराणसी, रायपूर, दुर्ग आणि टाटानगरसह इतर मोठ्या शहरात जाऊ शकता.