बेंगळुरुः शहरातील विविध ठिकाणा बॉम्ब (Bomb) ठेवल्याची धमकी मिळालीनंतर बेंगळुरू पोलिसांकडून ( Bangalore Police) सहा शाळा ताब्यात घेऊन बॉम्बचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. तर आणखी काही शाळेतून पोलीस दाखल झाले आहेत. शहर पोलीस आणि बॉम्ब निकामी पथकाने (Bomb Disposal Squad) शहरातील काही शाळा रिकाम्या करुन बॉम्बचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत दोन शाळांची चौकशी करण्यात आली असून पोलिसांनी सांगितले आहे की, अजूनपर्यंत काहीही सापडले नाही मात्र प्रथमदर्शनी ही कोणीतरी फसवण्यासाठी धमकी दिले असल्याचे स्पष्ट करण्यात आले. जे विद्यार्थी परीक्षेसाठी शाळेत आले होते, त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
बेंगळुरू शहराचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सुब्रह्मण्येश्वर राव यांनी सांगितले की दिल्ली पब्लिक स्कूल, सुलकुंटे, गोपालन इंटरनॅशनल स्कूल, महादेवपुरा, न्यू अकादमी स्कूल, मराठाहल्ली, एबेनेझर इंटरनॅशनल स्कूल, इलेक्ट्रॉनिक्स सिटी, सेंट व्हिन्सेंट पलोटी स्कूल, हेनूर आणि इंडियन पब्लिक स्कूल, गोविंदपुरा या शाळांना इमारतीमध्ये बॉम्ब ठेवले असल्याचा ईमेल त्यांना मिळाला होता.
Karnataka | Threat mail received by various schools across Bengaluru. Search operations are underway in these schools: Bengaluru City Police
— ANI (@ANI) April 8, 2022
ई-मेल अमेरिकेतून
हा शाळा व्यवस्थापनाला हा मेल सकाळी 11 ते 11.10 च्या दरम्यान ईमेल मिळाला आहे. हा मेल अमेरिकेतून केला असल्याचेही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले असून फसवण्यासाठी कोणीतरी हे कारस्थान केले आहे. मात्र कर्नाटकातील पोलिसांकडून या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी कोणतीही कसर सोडणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
#UPDATE | Karnataka: As of now, bomb threat mail has been received by schools. Local jurisdictional police searching/checking the spot. Bomb checking squad is also on spot. Mail has been received, and our personnel will check it: Kamal Pant, Commissioner of Police Bengaluru City pic.twitter.com/yMm6PfXEcp
— ANI (@ANI) April 8, 2022
कर्नाटकातील ज्या शाळेतून बॉम्ब ठेवल्याचा मेल मिळाला आहे, आणि त्याचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, “या मेल मध्ये तुमच्या शाळेत अतिशय शक्तीशाली बॉम्ब ठेवण्यात आला आहे. ही गोष्टी विनोद म्हणून घेऊ नका तर तुमच्या शाळेत अतिशय शक्तिशाली बॉम्ब पेरण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही ताबडतोब पोलिसांना कॉल करा, नाही तर तुमच्या शाळेतील अनके जीवांना धोका असून त्यांना त्रास होणार असल्याचे सांगितले. याबाबत कोणत्याही प्रकारचा उशीर करु नका अजूनही सर्व काही तुमच्या हातात आहे अशीही धमकी देण्यात आली आहे.”
सध्या अनेक शाळेतून परीक्षा सुरु आहेत, मात्र बॉम्ब ठेवण्याची अफवा मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्यात आम्ही सहा शाळा ताब्यात घेऊन तपास सुरु केला आहे. शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना आम्ही पालकांच्या ताब्यात दिले असून सध्या कसून तपास केला जात आहे. तपासानंतर याबाबत गुन्हा दाखल केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
संबंधित बातम्या
Rahul Gandhi: श्रीलंकेसारखं भारतातही सत्य बाहेर येईल; राहुल गांधी यांचा दावा