नवी दिल्ली : तेलंगणा राज्यात चालत्या ट्रेनच्या बोगीना आग लागल्याची घटना घडली आहे. फलकनुमा एक्सप्रेसच्या तीन बोगींना आग लागल्याने प्रवाशांनी वाट दिसेल तेथून डब्यांच्या बाहेर उड्या मारीत आपले प्राण वाचविले आहेत. यासंदर्भात मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त आहे. बलासोर रेल्वे अपघातानंतर रेल्वे अपघाताची मालीका थांबण्याचे नावच घेत नसल्याचे उघडकीस आले आहे.
यासंदर्भात वृत्तवाहीनीने दिलेल्या वृत्तानूसार तेलंगणाच्या पागिदिपल्ली – बोम्माईपल्ली दरम्यान चालत्या फलकनुमा एक्सप्रेसला अचानक आग लागली. या आगीची सुरुवात S – 4 बोगीतून झाली. आगीमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखत सुरक्षा चेन खेचली त्यामुळे गाडी थांबली. त्यामुळे प्रवाशांनी वाट दिसेल तेथून जीवाच्या आकांताने उड्या मारीत आपले प्राण वाचविले. या दरम्यान प्राथमिक माहितीनूसार या ट्रेनच्या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
हे पाहा ट्वीट –
#WATCH तेलंगाना: फलकनुमा एक्सप्रेस के 3 डिब्बों में आग लग गई, जिसके बाद इसे रोक दिया गया। सभी यात्री ट्रेन से उतर गए हैं किसी के हताहत होने की सूचना नहीं है। pic.twitter.com/63iqDz9HdW
— ANI_HindiNews (@AHindinews) July 7, 2023
ओदिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकादरम्यान 2 जून रोजी झालेल्या कोरामंडळ एक्सप्रेसच्या विचित्र अपघातानंतर अपघाताची मालिकाच सुरु आहे. बालासोर ट्रेन अपघातात सुमारे तीनशे जणांचा मृत्यू तर 1100 जण जखमी झाले होते. यानंतर या अपघाताची सीबीआय चौकशी सरु करण्यात आली आहे. या अपघातानंतर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलली जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती, परंतू यासंदर्भात कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचे उघडकीस येत आहे. आणि वारंवार रेल्वे अपघातांना सोमोरे जावे लागत आहे.