बंगळुरु : निवृत्तीनंतर अनेक जण आपली बकेट लिस्ट ठरवित प्रवासाचे बेत आखत असतात. काही जण प्रवासाला सुट्टीचे वेध लागताच प्रवासाचे प्लानिंग आखतात. परंतू काही जण लॉंग विकेण्डलाच नजिकचे हील स्टेशन गाठतात. परंतू एका बापलेकाने तर कमालचे केली आहे. कोणतीही प्लानिंग न करता 42 वर्षांचा मुलगा आपल्या 72 वर्षांच्या वडीलांना आणि 18 महिन्याच्या मिलो नावाच्या लाडक्या डॉगीला घेऊन हे त्रिकूट भटकंतीला निघाले आहे.
बंगळुरूचा 42 वर्षीय अकील नारायण आपल्या 72 वर्षांच्या निवृत्त वडीलांना ( अश्वत्थ नारायण ) घेऊन गेल्या अडीच महिन्यांपासून अनोखी पदयात्रा करीत आहेत. प्रवासाची कोणतीही योजना न आखता, कुठे जायचे कधी परतायचे असे कोणतेही नियोजन न करता बापलेक साहसी प्रवासला निघाले होते. हे म्हणजे संकटाला खुलेआम निमंत्रण होते. परंतू दोघांनी ठरविले की दोघांपैकी एकजण जरी आजारी पडला तर गाडी बॅक टू पेवेलियन ! असा एडव्हन्चर ऑफ लाईफटाईम प्रवास करायला निघालेल्या आम्ही बापलेकांनी 45 दिवसात जम्मू गाठले. तेव्हा मला माझ्या आईचा कॉल आला, म्हणजे तुम्ही आता परतणार तर ? अकील नारायण ट्रॅव्हलर या नियतकालिकाला मुलाखत देताना सांगत होता.
चला आपला देश पाहूया
मी जग फिरलो आहे. अनेक देश पालथे घातले आहेत. परंतू तेथे प्रत्येक पर्यटक मला तुम्ही इंडीया पाहीला आहे का असे विचारायचा तेव्हा मला अवघडल्यासारखे वाटायचे. त्यामुळे माझ्या मनात विचार आला चला आपला देश आता पाहूया, त्यात माझे वडील निवृत्त झाले होते आणि त्यांनी संपूर्ण देश पाहीला असल्याने ते मला त्यांच्या नजरेने देश दाखविण्यासाठी तयार झाल्याचे अकील याने सांगितले.
9,700 किमीचा प्रवास
आपल्या लाडक्या डॉगी मिलो आणि सुव्ह कारसह अकील आणि अश्वत्थ या बापलेकांनी सप्टेंबर 2022 मध्ये कोविड संपूर्ण ओसरल्याची खात्री झाल्यानंतर प्रवासाला सुरूवात केली. 45 दिवसात बंगळुरू ते गोवा नंतर महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू, हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडीशा आणि तामिळनाडू असा तब्बल 9,700 किमीचा प्रवास केला आहे.
कोरोनाचा असा लाभ झाला
अकील नारायण हा मूळचा बंगुळुरूवासी असला तर न्युझीलंडचे त्याने नागरिकत्व घेतलेले आहे. तो पेशाने प्रोडक्ट मॅनेजर असून त्याने साठ देश पाहीले आहेत. 2019 पासून त्याने वडीलांसोबत जग पाहायला सुरूवात केली. अनेक महिले इस्रायलच्या रस्त्यांवर वडीलांसोबत मनसोक्त भटकंती केली, परंतू अचानक कोरोना आला आणि त्यांच्या वर्ल्ड टुरचे प्लान फिस्कटले अन् त्यांना हिंदुस्तानात माघारी परतावे लागले. अकील याला देश पाहायचा होताच. त्याला युनेस्कोने जाहीर केलेल्या प्रत्येक पुरातन वास्तू पाहायच्या होत्या. दोघांना स्ट्यॅच्यु ऑफ युनिटी पहायचा होता. तर अकीलला कच्छचे रण, थर वाळवंट, ताजमहल, कुतुब मिनार, कोनार्कचे सूर्यमंदिर, खजुराहो पहायचे होते. तेव्हा त्यांच्या रोड टुरचा रफ प्लान आपोआप आखली गेला.