जम्मू : जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथील दहशतवादी हल्ल्यात 3 जवान जखमी झाले आहेत. अनंतनगामधील बिजबेरा या भागात भारतीय सैन्याने गस्तीवर असताना हा हल्ला झाला. हल्ल्यात जखमी झालेल्या एका जवानाची प्रकृती गंभीर आहे. हा हल्ला झाल्यानंतर भारतीय सैन्याने या परिसरात दहशतवाद्यांचा शोध घेणे सुरु केले आहे. (Three soldier were injured in a terrorist attack at Anantnag in Jammu and Kashmir)
मिळालेल्या माहितीनुसार अनंतनाग जिल्ह्यातील शम्शीपुराजवळील श्रीनगर-जम्मू हायवेवर जवान गस्तीवर होते. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. उत्तरादाखल भारतीय जवानांनीसुद्धा दहशतवाद्यांवर प्रतिहल्ला केला. मात्र, दहशतवादी या ठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी झाले. हल्ल्यानंतर आता भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांना शोधण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जखमी झालेल्या जवानांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमी झालेल्यांपैकी एका जवानाची प्रकृती गंभीर आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या दहशतवाद्यांनी परिसरातील एका शाळेच्या छतावरुन जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये शाळेचेही बरेच नुकसान झाले आहे. दरम्यान हा हल्ला झाल्यानंतर जवानांकडून शोधमोहीम सुरु असून अद्याप दहशतवाद्यांना पकडण्यात यश आलेले नाही.
मुस्लीम शासकांच्या काळातील अपवित्र नावं बदलणार; प्रज्ञासिंह ठाकूर यांचा नामांतराला पाठिंबाhttps://t.co/O2kUrpJcNv#Pragyasinghthakur | #Bhopal | #MadhyaPradesh
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 27, 2021
संबंधित बातम्या :
(Three soldier were injured in a terrorist attack at Anantnag in Jammu and Kashmir)