नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खानसाठी प्रत्येक दिवस भारी जात आहे. सेना इमरान खानला अटक करण्याचा प्रत्यत्न करत आहेत. कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. घराच्या सभोवताल कमांडो लावण्यात आले आहेत. इमरान खान यांचे राजकीय जीवन आता समाप्त होण्याचे संकेत मिळत आहेत. असं झाल्यास त्यांचा राजकीय वारसदार कोण असा प्रश्नही निर्माण होतो.
इमरान खान यांच्या तीन पत्नींबद्दल बोललं जाते. पण, इमरान खान यांना चार बहिणीसुद्धा आहेत. या बहिणी पूर्ण हिमतीनिशी भावासोबत उभ्या राहतात. दोन मुलांसोबत एक मुलगीसुद्धा आहे. तिला कित्तेक वर्षांपासून जगापासून दूर ठेवले आहे.
इमरान मूळ रुपात अफगाणिस्तानातील पठाण वंशाशी संबंधित आहेत. इमरान यांचे वंशज तैमूरच्या सेनेत होते ज्यांनी भारतावर आक्रमण केले होते. एक नजर टाकून इमराना यांच्या कुटुंबीयांवर.
इमरान खानचे वडील सिव्हिल इंजिनीअर होते. लंडनमधील इम्पेरीकल कॉलेज ऑफ लंडन येथे शिकून आले होते. पाकिस्तान चळवळीतही त्यांनी भाग घेतला होता. इमरान खान यांची आई शौकत खानम स्वातंत्र्यापूर्वी पंजाबच्या जालंधरमध्ये जन्मली होती.
५ ऑक्टोबर १९५२ मध्ये इमरान खान यांचा जन्म झाला. चार बहिणीसोबत शिकलेले इमरान खान लाजत होते. इमरान खान आपल्या आईच्या खूप जवळचे होते. १९८५ मध्ये त्यांच्या आईचे निधन कर्करोगाने झाले. आईच्या आठवणीप्रीत्यर्थ इमरान खान यांनी कँसर रुग्णालय तयार केले.
इमरान खान यांना चार बहिणी आहेत. या चारही बहिणी इमरानच्या पाठीशी उभ्या राहतात. अलिमा खानम एक यशस्वी उद्योजक आणि समाजसेविका आहेत. त्यांचा टेक्सटाईल व्यवसाय कराची आणि न्यूयार्क येथ पसरला आहे.