मुंबई : यूपीएससी टॉपर IAS अधिकारी टीना डाबी (Tina Dabi) यांचा घटस्फोट आणि त्यानंतर महाराष्ट्रातील आयएएस आधिकाऱ्याशी त्यांची जुळलेली प्रेमकाहणी ही देशभर गाजली. काही दिवसांपूर्वीच टीना डाबी यांनी मूळचे महाराष्ट्रातील, राजस्थानमधील कार्यरत आयएएस अधिकारी प्रदीप गवांडे (Pradip Gawande) यांच्याशी लग्न करत असल्याची घोषणाही केली. मात्र टीना डाबी यांचे पहिले पती अतहर आमिर खान (Ahter Aamir Khan) हेही आता दुसरं लग्न करणार आहेत. अतहर आमिर खान यांनी आपल्या इन्टा अकाऊंटवर एक फोटो शेअर करत लग्नाबाबत माहिती दिली आहे. अतहर आमिर खान हे मूळचे काश्मीरमचे आहेत. तसेच त्यांची होणारी पत्नी महरीन काझी याही काश्मीरच्याच आहेत. अतहर आमिर खान यांना आपलं प्रेम हे काश्मीरातच मिळालं आहे. तर टीना डाबी या महाराष्ट्राची सून झाल्या आहेत.
मेहरीन काझी या पेशाने डॉक्टर आहेत. एमडी मेडीसनचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या एका कॅन्सरील उपचार कारणाऱ्या रुग्णालयात सध्या प्रॅक्टीस करत आहेत. महरीन काझी या दिल्लीतल्या राजीव गांधी कॅन्सर संस्थेत सध्या काम करत आहेत एवढेच नाही तर फॅशन उद्योगाशीही त्या चांगल्याच सक्रिय आहेत. त्यांच्या सोशल मीडियावरील फॉलोअल्सचा आकडाही तितकाच मोठा आहे.
2015 च्या बॅचमधील युपीएससी टॉपर आणि सेकंड टॉपर यांच्या लव्ह स्टोरीची चांगलीच चर्चा रंगली होती. टीना डाबी या बॅचच्या टॉपर होत्या तर दुसऱ्या क्रमांकावर अहतर आमिर खान हे होते. काही दिवसात त्यांनी आपल्या लग्नाची घोषणा केली हे लग्न देशभर गाजलं होतं. मात्र हे लग्न फार काळ टिकलं नाही आणि त्यांनी शेवटी घटस्फोट घेतला. हा आंतरधर्मीय विवाह आणि काही दिवसातच घटस्फोट हे अनेकांसाठी सरप्राईजिंग होतं. दोघांमध्ये अचानक असं काय बिघडलं की थेट घटस्फोटापर्यंत गेलं हे कुणाच्याही न समजण्यापलिकचं होतं.
टीना यांच्या या घटस्फोटानंतर काही महिन्यांपूर्वीच त्यांनी मूळचे महाराष्ट्रातील आयएएस अधिकारी प्रदीप गावंडे यांच्याशी विवाह करत असल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब करत त्या महाराष्ट्राची सून होणार हे जाहीर करून टाकलं. ही लव्ह स्टोरी गेल्या काही महिन्यात चांगलीच चर्चेत होती. प्रदीप गावंडे हे टीना डाबी यांच्यापेक्षा वयाने 13 वर्षांनी मोठे आहेत.