मध्यप्रदेशचे (Madhya Pradesh) माजी मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे (Congress) जेष्ठ नेते दिग्विजय सिंह (Digvijay Singh) हे कायमच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. काँग्रेसचे एकनिष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्यातील नेतृत्व गूण आणि पक्षाप्रती असलेला एक निष्ठपणा पाहून त्यांच्यावर काँग्रेसने अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपावल्या आणि दिग्विजय सिंह यांनी देखील त्या जबाबदाऱ्यांना योग्य न्याय दिला. पक्षांनी त्यांच्यावर अनेक राज्यातील निवडणुकांची जबाबदारी सोपवली. दिग्विजय यांनी देखील काँग्रेसला निराश केले नाही. त्यातील अनेक राज्यात त्यांनी काँग्रेसला सत्ता मिळून दिली. दिग्विजय सिंह सक्रिय राजकारणात असताना त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने आसाम, महाराष्ट्र, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये चांगली कामगिरी केली. ते काँग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून देखील ओळखले जातात. मात्र अनेकदा त्यांच्या वादग्रस्त व्यक्तव्यामुळे पक्ष अडचणीत देखील आला. दिग्विजय सिंह हे राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाचे तसेच इतर हिंदूत्ववादी संघटनांचे कट्टर विरोधक मानले जातात. मात्र त्यांनी आपल्या नर्मदा परिक्रमेच्यावेळी आरएसएसचे कौतुक केल्याने ते चांगलेच चर्चेत आले होते.
दिग्विजय सिंह यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1947 रोजी इंदोरमध्ये झाला. दिग्विजय सिंह यांचे वडील बालभद्र सिंह हे तत्कालीन ग्वाल्हेर राज्यांतर्गत येणाऱ्या राघोगडचे राजा होते. वर्तमान स्थितीमध्ये राघोगड हे मध्यप्रदेशातील गुना जिल्ह्याच्या नावाने ओळखले जाते. दिग्विजय सिंह यांचे जन्म सधन घराण्यात झाला. त्यांचे वडील राजा असल्याने अनेक नेते त्यांच्या वडिलांच्या भेटीसाठी येत असत. राजकारणावर तासंतास चर्चा होत असत. याच वातावरणात दिग्विजय सिंह वाढले. त्यामुळे त्यांना राजकारणातील सर्व खाचखळगे चांगले माहित झाले. ते राजकारणातील डावपेच शिकले. पुढे काँग्रेसमध्ये काम करत असताना त्यांना या सर्व गोष्टींचा खूप फायदा झाला. दिग्विजय सिंह यांची दोन लग्न झाली. त्यांचा पहिला विवाह 1969 मध्ये राणा आशाकुमारी यांच्यासोबत झाला. त्यांना मुलं देखील झाली. मात्र दुर्दैवाने 2013 मध्ये कर्करोगाने त्यांच्या पहिल्या पत्नी राणा आशाकुमारी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी 2015 मध्ये पत्रकार असलेल्या अमृता राय यांच्यासोबत विवाह केला. मात्र अमृता राय आणि दिग्विजय सिंह यांच्या वयात बरेच अंतर असल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले.
दिग्विजय सिंह यांच्या राजकीय जीवनाला खऱ्या अर्थाने 1971 मध्ये सुरुवात झाली. 1971 मध्ये ते राघोगड नगरपालिकेत पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आणि लगेच नगपालिकेचे अध्यक्ष देखील बनले. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. 1977 साली ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येत राघोगडचे आमदार देखील झाले. 1978 – 79 या काळात त्यांना प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव पद देण्यात आले. या काळात केलेल्या चांगल्या कामगिरीचे बक्षीस म्हणून त्यांना पुन्हा एकदा काँग्रेसकडून 1980 साली तिकीट देण्यात आले. ते निवडून देखील आले. त्यांची त्यानंतर राज्य मंत्रीपदी वर्णी लागली. ते 1984 ते 1992 या काळात खासदार देखील होते. मात्र मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. ते सलग दोन टर्म मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर 2004 ते 2018 या काळात त्यांच्यावर काँग्रेसच्या महासचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र त्यांनी त्यानंतर घेतलेल्या भूमिकांमुळे आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे पक्ष अडचणीत आल्याने त्यांना महासचिवपदाच्या जबाबदारीतून मुक्त करून त्यांच्यावर पक्ष संघटनाची जबाबदारी सोपवण्यात आली.
रशिया-युक्रेन युद्धाचा भारतावर मोठा परिणाम, येत्या काळात पेट्रोल-डिझेलच्या दराचा भडका उडणार