मुंबई : जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचा उत्पादक असलेल्या सौदी अरेबियाने आपल्या उत्पादनात कपात केल्यामुळे सध्या जगभरात तेलाचे दर कडाडले आहेत. मागील काही दिवसांपासून भारतातही पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol and Diesel price) दर वाढले आहेत. आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 84.70 रुपये प्रतिलीटर वर पोहोचला आहे. सध्याची वाढ पाहता पेट्रोल आणि डिझेलचे दर आगामी दोन दिवसांमध्ये 85 रुपये प्रतिलीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुंबईत पेट्रोलचा आजचा दर 91.32 रुपये आहे. तर परभणीत पेट्रोल 93.73 रुपयांवर पोहोचले असून राज्यात या जिल्ह्यात पेट्रोलचा दर सर्वांत जास्त आहे.(todays petrol and diesel rate current update)
इंडियन ऑईलने (India Oil) दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जानेवारी महिन्यात पेट्रोल 1 रुपयांनी महागले आहे. तर डिझेच्या दरामध्ये एक रुपयापेक्षा जास्त वाढ झाली आहे. आज दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 84.70 रुपये, मुंबईमध्ये 91.32 रुपये, कोलकातामध्ये 86.15 रुपये तर चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 87.40 रुपये प्रतिलीटर आहे. तर दिल्लीमध्ये डिझेलचा दर 74.88 रुपये प्रतिलीटर, मुंबईमध्ये 81.60 रुपये प्रतिलीटर, कोलकाता शहरात 78.47 रुपये प्रतिलीटर आणि चेन्नईमध्ये डिझेलचा आजचा दर 80.19 रुपये प्रतिलीटर आहे.
राज्यातही मागील काही दिवासांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. पुण्यात आजचा पेट्रोलचा दर 90.99 रुपये प्रतिलीटर आहे. तर डिझेलचा दर 80.06 रुपये प्रतिलीटर वर पोहोचला आहे. कोल्हापापुरात पेट्रोल 90 रुपयांच्या पार पोहोचले असून आजचा दर 91.60 रुपये प्रतिलीटर आहे. तसेच, कोल्हापुरात डिझेलचे दर 80.58 रुपये प्रतिलीटर आहे.
जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे. कच्च्या तेलाची निर्यात करणारा जगातील सर्वात प्रथम क्रमांकाचा देश सौदी अरेबियाने आपल्या उत्पादनामध्ये घट केली आहे. सध्या कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 50 डॉलर रुपये आहे.
आग्रा – 84.12 रुपये प्रतिलीटर
अहमदाबाद – 84.07 रुपये प्रतिलीटर
अलाहाबाद – 84.38 रुपये प्रतिलीटर
भोपाळ – 92.55 रुपये प्रतिलीटर
चेन्नई – 87.40 रुपये प्रतिलीटर
मुंबई – 91.32 रुपये प्रतिलीटर
दिल्ली – 84.70 रुपये प्रतिलीटर
कोलकाता – 86.15 रुपये प्रतिलीटर
कोल्हापूर – पेट्रोल – 91.60 रुपये प्रतिलीटर, डिझेल – 80.58 रुपये प्रतिलीटर
पुणे – पेट्रोल – 90.99 रुपये प्रतिलीटर, डिझेल – 80.0 रुपये प्रतिलीटर
बीड – 92.37 रुपये प्रतिलीटर
परभणी – 93.73 रुपये प्रतिलीटर
औरंगाबाद – 92.55 रुपये प्रतिलीटर
नाशिक – 91.76 रुपये प्रतिलीटर
नागपूर – 91.82 रुपये प्रतिलीटर
(todays petrol and diesel rate current update)
संबंंधित बातम्या :