Tomato Price : टोमॅटो मिळतील स्वस्त! केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केली घोषणा, असा असेल भाव

| Updated on: Aug 10, 2023 | 3:47 PM

Tomato Price : टोमॅटोच्या किंमतीचा चढता आलेख केंद्र सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे. यापूर्वी केंद्र सरकारने हस्तक्षेप केला. पण तरीही बाजारात टोमॅटोची दरवाढ सुरुच आहे. टोमॅटो स्वस्त मिळतील, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केली.

Tomato Price : टोमॅटो मिळतील स्वस्त! केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केली घोषणा, असा असेल भाव
Follow us on

नवी दिल्ली | 10 ऑगस्ट 2023 : टोमॅटोच्या किंमतीचा (Tomato Price) चढता आलेख केंद्र सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे. टोमॅटोची महागाई संसदेपर्यंत पोहचली आहे. आरबीआयचे गव्हर्नरने पतधोरण समितीच्या बैठकीनंतर सध्याच्या आर्थिक वर्षात महागाई दर वाढण्याचा अंदाज व्यक्त केला. तर दुसरीकडे संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी (Finance Minister Nirmala Sitharaman) महागाईविरोधात मोर्चा उघडला. त्यांनी देशातील टोमॅटोच्या किंमत वाढीविरोधात केंद्र सरकारने पाऊल टाकल्याचे सांगितले. केंद्रीय मंत्र्यांनी लोकसभेत दिल्ली-एनसीआरसह देशात टोमॅटोच्या किंमती कमी करण्यावर जोर दिला. त्यामुळे टोमॅटोचे भाव लवकरच स्वस्त होण्याची शक्यता वाढली आहे.

स्वस्त टोमॅटोसाठी कसरत

दिल्ली-एनसीआरमध्ये सध्या 70 रुपये किलोने टोमॅटो विक्री होत आहे. आता सगळीकडे टोमॅटोचा भाव 70 रुपये करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी नाफेड आणि ग्राहक सहकारी संस्थांची मदत घेण्यात येत आहे. त्यासाठी सहकारी संस्था महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधून टोमॅटोची खरेदी करत आहे. 14 जुलैपासून बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये अगोदरच टोमॅटो स्वस्त करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

आयातीवरील प्रतिबंध मागे

दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तू स्वस्त करण्यासाठी केंद्र सरकार अनेक प्रयत्न करत आहेत. त्यासाठी योग्य पावलं टाकण्यात येत आहे. शेजारील देश नेपालमधून टोमॅटोच्या आयातीवर आता कोणतेही प्रतिबंध राहणार नाही. त्यासाठी आयात सुरु करण्यात आली आहे. त्यामाध्यमातून टोमॅटोची पहिली खेप वाराणसी, लखनऊ आणि कानपूर शहरात पोहचली आहे.

टोमॅटोचा चढता आलेख

दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोच्या किंमती 25-30 रुपये किलो होत्या. आता या किंमती 150 ते 250 रुपये प्रति किलो आहे. तर काही ठिकाणी हा भाव 220-300 रुपये प्रति किलोवर पोहचला आहे. व्यापारी, दलाल हे जास्त नफा कमावत आहे. तर शेतकऱ्यांना पण यंदा चांगला भाव मिळाला आहे. पावसाने ओढ दिल्यास दक्षिण राज्यात सुद्धा टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

किचन बजेट बिघडले

जून महिन्यात महागाईने उंच भरारी घेतली. टोमॅटोच्या किंमतीत 400 टक्क्यांची वाढ आली. अनेक ठिकाणी टोमॅटो 250 रुपयांवर पोहचला. खरीप पिकांवर मोठे संकट आले. मुसळधार पावसाने गणित बिघडवले. अद्रक, बटाटे, भेंडी, मिरची यांच्यासह इतर भाजीपाला महागला. त्यामुळे किचन बजेट विस्कळीत झाले.

7 आठवड्यात 7 पट दाम

जास्त पावसाने टोमॅटोच्या पिकावर पाणी फेरले. टोमॅटो खरब झाले. तसेच इतर भाजीपाला पण महागले. टोमॅटोच्या किंमती जून महिन्यापासून सातत्याने वाढत आहे. जूनमध्ये टोमॅटोच्या किंमती 30 रुपये प्रति किलो होत्या. 13 जून रोजी किंमती 50-60 रुपयांवर पोहचल्या. जूनच्या शेवटी भाव 100 रुपयांवर गेले. 3 जुलै रोजी टोमॅटोचे भाव 160 रुपये किलोपर्यंत वाढल्या. तर येत्या काही दिवसांत टोमॅटो 300 रुपये किलोवर पोहचणार असल्याची व्यापाऱ्यांची भविष्यवाणी आहे.