नवी दिल्ली : देशात टोमॅटोचा भाव (Tomato Price) कधी झटपट कमी होतील, याकडे सर्वसामान्य भारतीयांचे डोळे लागले आहेत. केंद्र सरकार टोमॅटोचे भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण या प्रयत्नावर दरवाढीने पाणी फेरले आहे. टोमॅटोने तर कांदा, पेट्रोल आणि स्रवांनाच मागे टाकले आहे. आतापर्यंत कांद्याने वांदे केल्याचे आपण ऐकले होते. पण आता टोमॅटो दिवसागणिक नवीन रेकॉर्ड करत आहे. टोमॅटोला जणू सोन्यावाणी भाव आला आहे. काही शहरात तर कधी देशात ऐकला नव्हता, इतका भाव मिळाला आहे. एक किलो टोमॅटोचा हा भाव ऐकून काहींना घेरी आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आरे हा कधी थांबणार असा सवाल जनता विचारत आहे.
केंद्राला वाकुल्या
टोमॅटोने गेल्या महिनाभरात आकाशाला गवसणी घातली. त्यावर तामिळनाडू सरकारने चांगला उपाय शोधला. स्वस्त धान्य दुकानावर अगदी स्वस्तात टोमॅटो उपलब्ध करुन देण्यात आले आहे. पण काही लोकांनाच त्याचा फायदा होत आहे. केंद्र सरकारने नाफेड आणि इतर एजन्सींना बाजारातून टोमॅटोची खरेदी करुन ग्राहक केंद्रावर विक्रीचे आदेश दिले होते. पण त्याचा मोठा परिणाम दिसून आला नाही. उत्तर भारतातील अनेक शहरात टोमॅटोचे भाव पुन्हा वधारले आहेत.
पावसाचा मार, टोमॅटोमुळे खिशावर ताण
उत्तर भारतात मुसळधार पावसाने जनजीवन अस्तव्यस्त झाले आहे. काही शहर तर जलमय झाली आहेत. घराघरात, हॉस्पिटलमध्ये पाणी शिरले आहे. भाजी बाजारात तर त्याहून वाईट अवस्था आहे. एकही भाजी स्वस्त नाही. टोमॅटोने तर सर्वात कहर केला आहे.
दीड महिन्यात भाव अनेकपट
गेल्या दीड महिन्यात टोमॅटोच्या भावाने व्यापाऱ्यांची आणि काही शेतकऱ्यांची चांदी झाली. 30 रुपये किलोपर्यंत टोमॅटो मिळत होता. गेल्या दीड महिन्यात मात्र टोमॅटोने 220 रुपये आणि त्यापेक्षा पण पुढची झेप घेतली आहे. भाव अनेक पटीने वाढले आहेत. काही ठिकाणी नेपाळमधून स्वस्तात टोमॅटो खरेदी करत त्याची चढ्या दराने विक्री करण्यात येत आहे.
टोमॅटोच्या किंमती गगनाला
एक किलो टोमॅटोत 3 लिटर पेट्रोल
चंदीगड, गाझियाबाद या शहरांमधील एक किलो टोमॅटोचे भावांनी सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. या किंमतीत 3 लिटर पेट्रोल सहज येईल. भारत जगात दुसरा सर्वात मोठा टोमॅटो उत्पादक देश आहे. चीन हा जगातील पहिला सर्वात मोठा टोमॅटो उत्पादक देश आहे. चीनमध्ये वार्षिक जवळपास 5.6 कोटी टन टोमॅटोचे उत्पादन होते. तर भारतात वर्षाला सरासरी 1.8 कोटी टन टोमॅटोचे उत्पादन होते.