त्रिपुरामध्ये 79 टक्क्यांपेक्षाही अधिक मतदान, मतदानाच नेमकं गणित कसं…

| Updated on: Feb 16, 2023 | 8:44 PM

काँग्रेसचे आमदार सुदीप रॉय बर्मन यांनी धमकावणाऱ्याना न जुमानता मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केल्याबद्दल त्यांनी मतदारांचे अभिनंदन केले आहे. तर धमकीच्या डावपेचांना न जुमानता मतदान केल्याबद्दल मी मतदारांचे अभिनंदन करत असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

त्रिपुरामध्ये 79 टक्क्यांपेक्षाही अधिक मतदान, मतदानाच नेमकं गणित कसं...
Follow us on

नवी दिल्लीः त्रिपुरा विधानसभा निवडणुकीचे मतदान दुपारी 4 वाजता संपले आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार 79 टक्क्यांपेक्षाही जास्त मतदान यावेळी झाले आहे. तर त्रिपुरा राज्यात एकूण 28.13 लाख मतदार आहेत. मतदानादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा (मार्क्सवादी) नेता आणि डाव्या पक्षाच्या दोन पोलिंग एजंटसह किमान तीन जण जखमी झाले आहेत. त्रिपुरामध्ये विधानसभेच्या मतदानासाठी सकाळी 7 वाजता सुरू झालेले मतदान हे सायंकाळी 4 वाजेपर्यंत संपले होते. या त्रिपुरा निवडणुकीमध्ये नेमके काय काय घडले त्यातील या महत्वाच्या घडामोडी…

  1. त्रिपुरी विधानसभा निवडणुकीविषयी सांगताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सिपाहिजाला जिल्ह्यातील बॉक्सनगर भागात अज्ञात व्यक्तींनी केलेल्या हल्ल्यात सीपीआय(एम) चे स्थानिक समितीचे सचिव जखमी झाले आहेत. त्या जखमी व्यक्तीला जवळच्याच आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तर गोमती जिल्ह्यातील काकरबन विधानसभा मतदारसंघात सीपीआय(एम) च्या दोन पोलिंग एजंटनाही बेदम मारहाण करण्यात आली. पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यातील खैरापूर येथे सीपीआय(एम) उमेदवार पवित्रा कार यांच्या पोलिंग एजंटच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आल्याने येथील वातावरण तंग होते.
  2. त्रिपुरामध्ये 40-45 ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याची नोंद झाली होती, त्यानंतर सर्व मशीन बदलण्यात आल्या होत्या. तर त्यानंतर मतदान पुन्हा सुरू करण्यात आले होते. असे प्रकार घडल्याने निवडणूक आयोगाने आवश्यक तेथे अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आले होते.
  3. टाउन बारडोवली मतदारसंघातून निवडणूक लढवणारे मुख्यमंत्री माणिक साहा हे प्रारंभी मतदारसंघामध्ये सक्रिय असल्याचे दिसून आले होते. तर विधानसभेत भाजपला पूर्ण बहुमत मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. येथे एका मतदान केंद्रावर जाताना त्यांनी पत्रकारांना सांगितले की, निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळेल याची मला 100 टक्के खात्री असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
  4. विरोधी पक्षनेते माणिक सरकार यांनी रामनगर मतदारसंघात मतदान केल्यानंतर, सर्वांनी लोकशाही पद्धतीने आणि शांततेमध्येच राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तर हे सरकार एकजुटीने स्थापन करण्याचेही आवाहन केले. राज्यात भाजप 60 पैकी 40 जागा जिंकणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्यसभा सदस्य आणि माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी या निवडणुकीविषय़ी विश्वास व्यक्त केला आहे. त्रिपुरामध्ये भाजप-आयपीएफटी युतीने 2018 च्या निवडणुकीत 44 जागा जिंकल्या होत्या.
  5. ईशान्येकडील राज्याने गेल्या पाच वर्षांत शिक्षणापासून आरोग्यसेवेपर्यंत पायाभूत सुविधांपर्यंत सर्वच गोष्टींवर मोठा विकास केला आहे. माजी मुख्यमंत्री देब यांनी आपल्याला खात्री असल्याचे सांगत 40 हून अधिक जागांवर आमचे उमेदवार विजयी होती, आणि भाजपला विजयी करतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. उदयपूरमध्ये मतदानासाठी जाण्यापूर्वी देब यांनी त्रिपुरेश्वरी मंदिरात प्रार्थना केली आहे. तर मतदान सुरू असताना, सीपीआय(एम) आणि काँग्रेसने सर्व अडचणींना तोंड देऊन आणि ‘लोकशाही पुनर्संचयित’ करण्याचा लोकशाही अधिकार वापरल्याबद्दल मतदारांचे आभारही मानले आहेत.
  6. एका व्हिडिओ संदेशामध्ये सीपीआय(एम) चे राज्य सचिव जितेंद्र चौधरी यांनी सांगितले की, लोकशाही पुनर्संचयित करण्यासाठी सर्व अडचणींविरुद्ध मतदान केल्याबद्दल मी सर्व 60 विधानसभा जागांच्या मतदारांचे आभार मानतो. हिंसाचाराच्या काही घटना या नोंदवण्यात आल्या असून लोकांनी या निवडणुकीत धैर्य दाखवल्याचेही त्यामध्ये म्हटले आहे. धमक्या आणि धमकावूनही मतदारांनी शांतताप्रियतेने लोकांनी मतदान करुन विद्यमान सरकारला हटवण्यासाठी लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घेतला असल्याची भावना राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती. तर जे मतदार अद्याप बूथवर गेले नाहीत त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी बूथवर जाऊन लोकशाहीसाठी मतदान करावे असंही त्यांनी यावेळी सांगितले.
  7. काँग्रेसचे आमदार सुदीप रॉय बर्मन यांनी धमकावणाऱ्याना न जुमानता मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केल्याबद्दल त्यांनी मतदारांचे अभिनंदन केले आहे. तर धमकीच्या डावपेचांना न जुमानता मतदान केल्याबद्दल मी मतदारांचे अभिनंदन करत असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
  8. ईशान्येकडील राज्यात यावेळी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजप-आयपीएफटी युतीने सत्ता टिकवण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे, तर डावी-काँग्रेस आघाडी सत्ता मिळवूही पाहत आहे. प्रादेशिक संघटना टिपरा मोथा स्वायत्त परिषद निवडणुकीतील त्यांच्या शानदार कामगिरीनंतरही लढत आहे. भाजप-आयपीएफटी युतीने गेल्या निवडणुकीत आदिवासी भागात 20 पैकी 18 जागा जिंकल्या होत्या, तर यावेळी टिपराला मोथाचे कडवे आव्हान आहे.
  9. दोन वर्षांपूर्वी झालेल्या त्रिपुरा आदिवासी क्षेत्र स्वायत्त जिल्हा परिषद (TTAADC) निवडणुकीत 30 पैकी 18 जागा जिंकल्या होत्या. तर 259 उमेदवारांचे भवितव्य ठरवण्यासाठी ईशान्येकडील राज्यातील 3,337 मतदान केंद्रांवर दिवसभरात एकूण 28.13 लाख मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
  10. भाजपने 55 विधानसभा जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याचा मित्रपक्ष आयपीएफटीने सहा जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. या जागेवर दोन्ही पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली. तर डाव्या आघाडीने 47 तर काँग्रेसने 13 जागांवर निवडणूक लढवली होती. तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) 28 जागांवर उमेदवार उभे केले होते. याशिवाय 58 अपक्ष उमेदवारही रिंगणात होते. या मतदानाचा निकाल 2 मार्च रोजी होणार आहे.