नवी दिल्ली : देशभरात दसऱ्याचा उत्साह पहायला मिळात असताना तेलंगणा वेगळाच माहौल आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव(CM K. Chandrashekar Rao) हे विजयादशमी अर्थात दसऱ्याचा दिवशी आपल्या नव्या राष्ट्रीय पक्षाची घोषणा करणार आहेत. त्याआधीच लोकांना आकर्षित करण्यासाठी चिकन आणि दारुच्या बाटल्यांचे वाटप करण्यात येत आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने के चंद्रशेखर राव देखील तायरी लागले आहेत. राव अनेक नेत्यांच्या संपर्कात आहेत.
राव यांनी देखील ‘भाजप मुक्त भारत’ असा नारा दिला आहे. तेलंगणा राष्ट्र समिती (Telangana Rashtra Samithi) राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. विजयादशमीला राव आपल्या नव्या राष्ट्रीय पक्षाचे नाव जाहीर करणार आहेत.
नव्या पक्षाची घोषणा होण्याआधीच तेलंगणातील टीआरएस नेता राजनाला श्रीहरी हे लोकांना जिवंत कोंबड्या आणि दारूच्या बाटल्याचे वाटप करत आहेत.
याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये कोंबड्या आणि दारुच्या बाटल्या घेण्यासाठी लोकांनी लांबच लांब रांगा लावल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.
एक टेबल टाकून येथे कोंबड्या आणि दारुच्या बाटल्यांचे वाटप करण्यात येत आहे. मागे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, तसेच इतर नेत्यांचे कट आऊट लावण्यात आले आहेत.
लोक रांग लावून कोंबड्या आणि दारुच्या बाटल्या घेताना दिसत आहेत. या ठिकाणी कोणतीही गर्दी अथवा धक्काबुक्की न करता लोक अगदी शिस्तबद्ध पद्धतीने रांग लावून कोंबड्या आणि दारुच्या बाटल्या घेत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
#WATCH | TRS leader Rajanala Srihari distributes liquor bottles and chicken to locals ahead of Telangana CM KC Rao launching a national party tomorrow, in Warangal pic.twitter.com/4tfUsPgfNU
— ANI (@ANI) October 4, 2022