पाखंडी भोलेबाबाचे अनुयायी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब आणि हरियाणात पसरलेत. भोलेबाबा जाटव अर्थात दलित समाजातून येत असल्यामुळे अनुयायांमध्ये सर्वाधिक संख्या एससी-एसटी वर्गाची आहे. यूपीत दलित २२ टक्के असू 17 लोकसभा आणि 86 विधानसभा दलितांसाठी आरक्षित आहेत. मध्यप्रदेशात 15 टक्के दलित आहेत. 10 लोकसभा आणि 47 विधानसभा आरक्षित पंजाबात ३२ टक्के दलित समाज. 4 लोकसभा. 32 विधानसभा आरक्षित हरियाणात २१ टक्के दलित 2 लोकसभा आणि 17 विधानसभा आरक्षित याच व्होटबँकेमुळे बाबाला संरक्षण दिलं जात असल्याचा आरोप होतोय
योगी सरकार उत्तर प्रदेशात कायद्याचं राज्य आल्याचं दावा करतं. मात्र दुसरीकडे या पाखंडी भोलेबाबानं स्वतःची आर्मी उभी केली. ज्यापुढे यूपी पोलिसांचं देखील काहीही चालत नाही….बाबाची सिक्युरिटी., बाबाचा सत्संग इथं फक्त बाबाच्याच आर्मीचाच कायदा चालतो. आर्मीला बाबानं नारायणी सेना असं नाव दिलंय. ही सेना लोकांना तर सोडा पोलिसांना देखील चित्रीकरण करु देत नाही. त्याच सेनेच्या धक्काबुक्कीमुळे चेंगराचेंगरी घडल्याचाही आरोप होतोय.
बाबाच्या ताफ्यापुढे त्याचे ब्लॅक कमांडो.,, ताफ्याच्यासोबत व्हाईट कमांडो. आणि पाठीमागे गुलाबी गणवेशात महिला कमांडो असतात. भोलेबाबाच्या ताफ्याआधी त्याची ब्लॅक कमांडो सेना अशा प्रकारे निघते. गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही फक्त मतांच्या राजकारणासाठी बाबा आपलं साम्राज्य वाढवत राहिला. भोलेबाबाविरोधात 5 केसेस आहेत, पोलीस असताना लैंगिक शोषणाचा आरोप आहे. जमीन हडपल्याचाही गुन्हा दाखल आहे. साथ क्या लाये हो., आणि और साथ क्या ले जावोगे असा भक्तांना उपदेश देणारा हा भोंदूबाबा स्वतः डिझायनर पँट, डिझायनर कोट, डिझायनर टाय वापरायचा., स्वतःसाठी एक डिझायनरही नेमला होतं.
पाहा व्हिडीओ:-
खुलेआम अंधश्रद्धेचा बाजार मांडलेल्या बाबावर कोणतीही कारवाई झाली नाही. हातात सुदर्शन चक्र दाखवून हा भोंदूबाबा भक्तांना वेड्यात काढायचा. त्याच्या गावातलं हापश्याच्या पाण्यानं रोग बरे होतात., म्हणून त्यानं अध्यात्माची सुरुवात केली. तूर्तास यूपीत किमान आयोजकांवर गुन्हे तरी दाखल झालेत, मात्र खारघरमधल्या दुर्घटनेत अद्याप कारवाई का झाली नाही. असा प्रश्न विरोधकांनी सरकारला केलाय. एका सभागृहात होणारा सन्मान सोहळा खुल्या मैदानात लाखोंच्या गर्दीनं घेतला गेला.
१६ लोकांचा उष्माघातानं मृत्यू झाला. सरकारच आयोजक असूनही गलथानपणा समोर आला. ज्या पुरस्कार सोहळ्याचं स्वरुप १ कोटी रुपयांचं आहे. त्याच्या फक्त आयोजनावर सरकारनं १४ कोटी खर्च केले., सरकारवर झालेल्या टीकेनंतर आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांच्याच सांगण्यावर सोहळा दुपारी ठेवल्याचं मुनगंटीवार म्हणाले होते., पण आजही 16 मृत्यू कुणाच्या चुकीमुळे झाले. याचं उत्तर कुणाकडेही नाहीय