चंदीगड : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Siddhu Moosewala)याची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. त्यानंतर पंजाबमधील वातावरण चांगलेच तापले आहे. कारण सिद्धू मुसेवाला याची सुरक्षाव्यवस्था राज्य सरकारने कमी होती. तर त्याला असणाऱ्या सुरक्षा रक्षकांची कमी करून ती दोनवर आणली होती. त्यानंतरच त्याच्यावर भरदिवसा गोळीबार करण्यात आला होता. ज्यात मारेकऱ्यांनी मुसेवालाच्या शरिराची चाळण केली होती. त्याच्यावर सुमारे दोन डझन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. हे आता पोस्टमॉर्टममध्ये (Postmortem) समोर येत आहे. या प्रकरणानंतर सिद्धू यांच्या कुटुंबीयांनी तीव्र शोक व्यक्त करत आप सरकारला (AAP Government) धारेवर धरले आहे होते. तर यानिमित्तानं पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असले तरी या हत्येनंतर पंजाबातील गँगवॉर आणखी भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इतकेच काय तर पंजाब पोलिसांनी उत्तराखंडमधून 6 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, सिद्धू मुसेवाला यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टमही पूर्ण झाले आहे. पाच डॉक्टरांच्या समितीने सिद्धू मुसेवाला यांचे पोस्टमॉर्टम पूर्ण केले आहे.
पाच डॉक्टरांच्या समितीने सिद्धू मुसेवाला यांचे पोस्टमॉर्टम करताना त्यांच्या शरीरावर सुमारे दोन डझन गोळ्यांच्या जखमा असल्याचे सांगण्यात येत आहे. रिपोर्टनुसार, अतिरक्तस्रावामुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर या हत्याकांडात मुसेवालाच्या अंतर्गत अवयवांनाही इजा झाल्याचे आढळल्या आहेत. याशिवाय डोक्याच्यात एक गोळीही सापडली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हिसेराचे नमुने पुढील तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. त्याच वेळी, पोस्टमॉर्टममधून समोर आलेल्या गोष्टी अद्याप पोलिसांशी शेअर करण्यात आलेल्या नाहीत. दुसरीकडे, सर्व संशयितांची ओळख पटल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आणि लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असेही पंजाब पोलिसांनी सांगितले आहे.
सिद्धू मुसेवाला खून प्रकरणाचा तपास करत असलेले पोलीस सोमवारी मानसातील कांचिया भागातील मनसुख वैष्णो ढाब्यावर पोहोचले. ढाब्यावर लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा स्कॅन करण्यात आला. 29 मे रोजी सीसीटीव्हीमध्ये काही मुले ढाब्यावर जेवण करताना दिसली. पंजाब पोलिसांनी सीसीटीव्ही सोबत घेतले आहेत. हल्लेखोर जेवण घेण्यासाठी या ढाब्यावर थांबले असल्याचा संशय पोलिसांना आहे. सीसीटीव्हीत दिसणारी ही मुले खरोखरच हल्लेखोर आहेत का? त्यांचा या हत्येत सहभाग आहे की नाही, याचा तपास होणार आहे.
मात्र, पंजाबमधील मानसा येथे रविवारी पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सोमवारी याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईची चौकशी केली असून त्याच्या बॅरेक्सचीही झडती घेतली आहे. मात्र, झडतीदरम्यान पोलिसांना लॉरेन्सच्या बॅरेकमधून काहीही मिळाले नाही.