बिजनौर : उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये हैराण करणारी घटना उघडकीस आली आहे. एका 14 वर्षाच्या मुलीच्या पोटात दुखू लागले. आई-वडिल तिला डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता पोटात जे दिसले ते पाहून घरच्यांसह डॉक्टरही हैराण झाले. मुलीच्या पोटात केसांचा गुच्छ आढळून आला. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन दोन किलोहून अधिक केसांचा गुच्छ पोटातून काढला. या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली. मुलीला लहानपणापासूनच केस खाण्याची सवय होत.
अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर अखेर डॉक्टरांच्या टीमने मुलीच्या पोटातील 2 किलोहून अधिक केस काढून यशस्वी ऑपरेशन केले. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. आता मुलीची प्रकृती स्थिर असून, सध्या मुलीला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. यशस्वी शस्त्रक्रिया केल्याबद्दल नातेवाईकांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत.
बिजनौर शहरात राहणाऱ्या या 14 वर्षीय निष्पाप मुलीला गेल्या अनेक वर्षांपासून गुपचूप केस खाण्याची सवय होती. यामुळे मुलीच्या पोटात केसांचा मोठा गुच्छ जमा झाला. यामुळे मुलीला पोटदुखी आणि उलट्या होण्याच्या तक्रारी सुरू झाल्या. काहीही खाल्ले की उलट्या व्हायच्या. त्यानंतर तिची प्रकृती ढासळू लागली.
मुलीचे वडिल तिला प्रकाश हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तेथे डॉ. प्रकाश यांनी पोटाचा अल्ट्रासाऊंड केला असता त्यात केसांची गुच्छ दिसला. डॉक्टर प्रकाश यांनी पोटावरील शस्त्रक्रियेद्वारे पोटातील सुमारे अडीच किलो केसांचा गुच्छ काढला आहे. आता मुलीची प्रकृती स्थिर आहे.