UGC NET परीक्षेची तारीख बदलणार? पाहा काय आहे कारण?

| Updated on: Dec 24, 2024 | 9:56 PM

तुम्ही UGC NET ची परीक्षा देणार असाल तर ही बातमी नक्की वाचा. द्रमुकच्या खासदार कनिमोजी यांनी UGC NET 2024 डिसेंबर सत्राच्या परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यासंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहिले आहे.

UGC NET परीक्षेची तारीख बदलणार? पाहा काय आहे कारण?
Follow us on

UGC NET ची परीक्षा जानेवारीमध्ये होणार आहे. पण, आता यात बदल होण्याची देखील एक शक्यता व्यक्त केली जात आहे. UGC NET च्या डिसेंबर 2024 सत्र परीक्षेच्या तारखा बदलल्या जाऊ शकतात. द्रमुकच्या खासदार कनिमोजी करुणानिधी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना परीक्षेचे वेळापत्रक तातडीने बदलण्याची विनंती केली आहे.

द्रमुक खासदाराने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. ही परीक्षा 3 जानेवारी ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत होणार आहे.

द्रमुक खासदाराने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पोंगल 15 आणि 16 जानेवारीला येत आहे. अशा परिस्थितीत UGC NET परीक्षेच्या तारखांचे वेळापत्रक बदलण्यात येणार आहे. पोंगल हा केवळ सण नाही. हा तमिळ अभिमान आणि अस्मितेचा उत्सव आहे.

तामिळनाडूच्या सांस्कृतिक मूल्यांचा आदर करण्यासाठी आणि कोणत्याही विद्यार्थ्याला त्यांचे शिक्षण आणि त्यांची परंपरा यापैकी एकाची निवड करण्यास भाग पाडले जाऊ नये, यासाठी परीक्षांचे वेळापत्रक तातडीने बदलण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.

‘पोंगलच्या दिवशी 15 आणि 16 जानेवारी रोजी निश्चित करण्यात आलेल्या UGC NET परीक्षेच्या तारखांमध्ये तातडीने बदल करण्याची विनंती मी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे, असं कनिमोजी यांनी म्हटलं आहे. पोंगलच्या दिवशी सीएची परीक्षाही होणार होती, तेव्हाही तारीख बदलण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला होता.

UGC NET 2024 परीक्षा दोन शिफ्टमध्ये

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) ज्युनिअर रिसर्च फेलोशिप, असिस्टंट प्रोफेसर पात्रता आणि PhD प्रवेशासाठी डिसेंबर सत्रातील UGC NET परीक्षा दोन शिफ्टमध्ये आयोजित केली आहे. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये होणार असून, पहिली शिफ्ट सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार आहे.

UGC NET परीक्षेच्या महत्त्वाच्या तारखा एकदा पाहुण घ्या

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 डिसेंबर
शुल्क भरण्याची शेवटची तारीख: 11 डिसेंबर
फॉर्म मध्ये दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख: 13 डिसेंबर
परीक्षेची तारीख: 1 जानेवारीपासून 19 जानेवारी 2025

PhD करायची?

PhD प्रवेश गुणवत्ता यादी कशी तयार होते? याचं प्रश्नाचं उत्तर पुढे वाचा. नेट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या नेट पर्सेंटाइलला 70 टक्के, तर मुलाखतीला 30 टक्के वेटेज देण्यात येणार आहे. कॅटेगरी 2 आणि कॅटेगरी 3 या दोन्ही कॅटेगरीतील नेट स्कोअर केवळ एका वर्षासाठी वैध असेल.