NDA-38 vs UPA-26 | आज विरोधी पक्षांच्या बैठकीत महाराष्ट्रातील महत्वाच्या पदाबाबत निर्णय होण्याची शक्यता

| Updated on: Jul 18, 2023 | 9:04 AM

NDA-38 vs UPA-26 | बंगळुरुमध्ये विरोधी पक्षांची मोठी बैठक होत आहे. काल रात्री डिनर डिप्लोमसी झाली. स्नेह भोजनाच्या निमित्ताने नेते एकत्र आले. त्यांच्यात चर्चा झाली.

NDA-38 vs UPA-26 | आज विरोधी पक्षांच्या बैठकीत महाराष्ट्रातील महत्वाच्या पदाबाबत निर्णय होण्याची शक्यता
Opposition partys important meeting at bengluru
Follow us on

बंगळुरु : भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी देशातील विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. आगामी 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणीत NDA आणि काँग्रेस प्रणीत UPA असा सामना पाहायला मिळू शकतो. सध्याच्या घडीला भाजपाला सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता मिळवण्यापासून रोखणं हाच विरोधी पक्षांचा उद्देश आहे. त्यासाठी आज बंगळुरुमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली 26 विरोधी पक्ष एकत्र येणार आहेत. देशातील आगामी राजकारणाच्या दृष्टीने ही बैठक खूप महत्वाची आहे.

भाजपा विरोधात रणनिती तयार करण्यासाठी काही महत्वाचे निर्णय या बैठकीत होऊ शकतात. काल देशाच्या वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या पक्ष प्रमुखांच काँग्रेस नेत्यांनी बंगळुरुमध्ये जोरदार स्वागत केलं होतं. शरद पवार UPA च्या बैठकीसाठी बंगळुरुला रवाना झाले आहेत.

पवारांच्या अनुपस्थिती भुवया उंचावल्या

काल रात्री डिनर डिप्लोमसी झाली. स्नेह भोजनाच्या निमित्ताने नेते एकत्र आले. त्यांच्यात चर्चा झाली. महाराष्ट्रातून या बैठकीला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अनुपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

महाराष्ट्रातील पदाबाबत निर्णय होणार?

पण आज होणाऱ्या मुख्य बैठकीला शरद पवार उपस्थितीत राहणार असल्याची माहिती आहे. मोदी आणि भाजपा विरोधात रणनिती ठरवण्यासाठी ही बैठक होत असली, तरी महाराष्ट्रातील एका पदाबाबत महत्वाचा निर्णय या बैठकीत होऊ शकतो.

कारण त्यांचे आमदार जास्त होते

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. पक्षात दोन गट पडले. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक गट सत्तेत सहभागी झाला. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली दुसरा गट विरोधी बाकांवर आहे. ही फूट पडण्याआधी राज्याच विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे होतं. कारण त्यांची आमदार संख्या अधिक आहे.

मविआत मोठा भाऊ कोण?

पण आता फुटीमुळे राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या घटली आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेस विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार अशी चर्चा आहे. आज बंगळुरुमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांमध्ये यावर चर्चा होऊ शकते.

नाव कधी जाहीर होणार?

विरोधी पक्षनेतेपदाबाबत अजूनही स्पष्टता नाहीय. मात्र केंद्रीय नेतृत्वाची शरद पवारांसोबत चर्चा झाल्याची माहिती आहे. बंगळूरूत विरोधी पक्षनेते पदावर शिक्कामोर्तब झालं, तरी आज काँग्रेसकडून नावं जाहीर होणार नाही. महाराष्ट्र विधानसभेच पावसाळी अधिवेशन सुरू होऊनही विरोधी पक्षनेते पदाबाबत स्पष्टता नाहीय. आज बंगळुरूत राज्यातील परिस्थितीवर शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांमध्ये चर्चा होईल, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.