पाटणा : भाजपला सोबत घेऊन सत्ता स्थापन केल्यानंतर नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी धडाडीने काम करायला सुरुवात केली आहे. त्यांनी बिहारमधील जनतेला शासकीय रुग्णालयात उपाचार घेत असताना सकस आहार मिळवा यासाठी ‘दिदी की रसोई’ ही योजना सुरु करण्याची घोषणा केली आहे. नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या योजनेसाठी बिहारच्या आरोग्य विभागाने प्रस्ताव सादर केला होता. (under the scheme didi ki rasoi Bihar government will give food to patients who admitted in district hospital)
या निर्णयानुसार बिहारमधील जिल्हा तसेच उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ज्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यांना ‘दिदी की रसोई’ या योजनेंतर्गत सकस आहार दिला जाईल. हा आहार स्वयं सहायता महिला बचत गटांकडून बनवला जाईल.
वैशाली जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर योजनेची सुरुवात
या योजनेची सुरुवात बिहार प्रशासनाने वैशाली जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर सुरुवात केलेली होती. त्यानंतर बिहार ग्रामीण उपजीविका संवर्धन सोसायटी (BRLPS) अंतर्गत गया, सहरसा, पूर्णिया, बक्सर, शेहर आणि शेखपुरा या जिल्ह्यांमध्ये या योजनेचा विस्तार केला गेला.
दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार बिहारमध्ये स्वयं साहाय्यता महिला बचत गटांमधील 10.18 लाख महिला ‘दीदी की रासोई’ या योजनेशी जोडल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर आता नितीश कुमार यांनी या योजनेचा विस्तार अन्य जिल्ह्यात करण्याचे निर्देश दिले आहेत.
गंगूबाई काठियावाडी चित्रपटावरुन वादाचा धुरळा, आलिया भट्टचं म्हणणं काय?https://t.co/6YDtzpudLh #GangubaiKathiawadi | #Bollywood | #movie | #AliaBhatt | #SanjayLeelaBhansali | @aliaa08
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 13, 2021
संबंधित बातम्या :
(under the scheme didi ki rasoi Bihar government will give food to patients who admitted in district hospital)