देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प आज म्हणजेच मंगळवार 23 जुलै 2024 ला संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प मांडतील. या अर्थसंकल्पाकडे सर्वसामान्य नागरिकांपासून ते बडे उद्योजकांसह लक्ष लागलेलं असणार आहे. मोदी 3.0 सरकार आणि NDA सरकारच्याय अर्थसंकल्पात कोणत्या मोठ्या घोषणा होतात याची सर्वांना उत्सुकता आहे. याआधी काही वर्षे अर्थसंकल्प हा 1 फेब्रुवारीला सादर केला जात आहे. मात्र यंदा निवडणुक असल्यामुळे 2024-25 या आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला गेला होता. यंदाचा अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता सादर केला जाणार आहे. तुम्हाला पाहायचा असेल तर खाली दिलेल्या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
तुम्ही आज अर्थसंकल्पीय भाषणाचे थेट प्रक्षेपण डीडी न्यूजवर पाहू शकता. याशिवाय तुम्ही डीडी नॅशनलवर थेट प्रक्षेपण देखील पाहू शकता. तुम्हाला तुमच्या फोनवर लाईव्ह टेलिकास्ट पहायचे असेल, तर तुम्ही ते डीडी न्यूजच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरही पाहू शकता.
केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये केलेल्या महत्त्वाच्या घोषणांचे सर्व तपशील सरकारद्वारे अधिकृत वेबसाइटवर अपलोड केले जातील. www.indiabudget.gov.in या अधिकृत वेबसाइटवर तुम्हाला तुम्ही हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये बजेट दस्तऐवज पाहू शकाल. हे PDF स्वरूपात उपलब्ध असतील, जे तुम्ही डाउनलोड, पाहू आणि वाचू शकता.
मोदी सरकारने 28 फेब्रुवारी रोजी सादर होणारे बजेट 1 फेब्रुवारी रोजी सादर करायला सुरूवात केली. स्वतंत्र रेल्वे बजेट बंद करण्यात आले. रेल्वे अर्थसंकल्प सर्वसाधारण बजेटमध्ये समाविष्ट करण्यात आले. रेल्वे बजेट स्वतंत्रपणे सादर करण्याची पंरपरा संपुष्टात आणण्याची सूचना तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली होती.