मुंबई : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 18 वर्षांवरील लोकांसाठी कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीच्या बुस्टर डोसचे (Corona Vaccine Booster Dose) अंतर सध्याच्या 9 महिन्यांवरून 6 महिन्यांपर्यंत कमी केले आहे. त्यामुळे आता तुम्हाला लवकर बुस्टर डोस घेता येणार आहे. कोरोनाचा धोका (Corona Update) अजून पूर्ण टळला नाही. सध्या चौथ्या लाटेची टांगती तलवारही (Fourth Wave Of Corona) कायम आहे. त्यामुळे लसीकरण वाढवण्यावर शासनाचा भर आहे. जर तुम्ही दुसरा डोस घेतला असेल, तर आता तुम्हाला बूस्टर डोससाठी 9 महिन्यांऐवजी 6 महिने किंवा 26 आठवडे थांबावे लागेल. 18 ते 59 वयोगटातील सर्व लोकांना आता 9 महिन्यांऐवजी 6 महिन्यांनी बूस्टर डोस दिला जाईल, असे सरकारकडून सांगण्यात आले. नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (NTAGI), सरकारची लसीकरणावरील सल्लागार संस्थने दुसऱ्या आणि बूस्टर डोसमधील अंतर कमी करण्याची शिफारस केली होती. गेल्या दोन वर्षात कोरोनाने जगाला हैराण करून सोडलं आहे. लस हाच एकमेव उपाय कोरोनावर आहे.
Union Health Ministry reduces gap for COVID-19 precaution doses from existing 9 months to 6 months for those above 18 years pic.twitter.com/s7YmO3SwZh
— ANI (@ANI) July 6, 2022
याशिवाय NTAGI ने 12 वर्षांखालील मुलांसाठी लसीकरणासाठी शिफारसी देखील दिल्या आहेत. NTAGI सूत्रांनी सांगितले की 12-17 वयोगटातील लसी कमी आहेत, त्या वाढवण्याची गरज आहे. या वयोगटातील लोकांना 12 वर्षे वयोगटातील लोकांपेक्षा जास्त धोका असतो. बूस्टर म्हणून CORBEVAX चा वापर करण्यावर NTAGI कडून अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. कोरोनापासून बचाव करण्यासाठी आतापर्यंत बूस्टर डोस घेण्यासाठी 9 महिने वाट पाहावी लागत होती. मात्र सरकारच्या या निर्णयानंतर ज्यांनी दुसरा डोस घेतला आहे, त्यांना डोस घेतल्यापासून सहा महिन्यांनंतर बूस्टर डोस मिळू शकेल.
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि प्रशासन यांना लिहिलेल्या पत्रात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, 18-59 वर्षे वयोगटातील खाजगी कोविड लसीकरण केंद्रांमध्ये (CVCs) 6 महिने किंवा 26 आठवडे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकजण बूस्टर डोस घेऊ शकतो. याच पत्रात म्हटले आहे की 60 वर्षे आणि त्यावरील लोक आणि आरोग्य सेवा कर्मचारी, फ्रंट लाइन कामगारांना दुसरा डोस 6 महिने किंवा 26 आठवडे पूर्ण झाल्यानंतर बूस्टर डोस विनामूल्य दिला जाईल. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.