“काँग्रेसने इतकी वर्षे राज्य केलं, पण आदिवसांचा विकास कधी सन्मान केला नाही”; अमित शाह यांचा कर्नाटकातून काँग्रेसवर हल्लाबोल

| Updated on: May 06, 2023 | 7:36 PM

राहुलबाबा तुम्ही पाच घोषणा केल्या होत्या, मात्र त्याच घोषणा तुम्ही इतर राज्यात केल्या होत्या तिथं मात्र तुमचा पराभव झाला आहे अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यामुळे आताही बरं झालं तुम्ही हीच पाच अश्वासन इथे दिली आहेत

काँग्रेसने इतकी वर्षे राज्य केलं, पण आदिवसांचा विकास कधी सन्मान केला नाही; अमित शाह यांचा कर्नाटकातून काँग्रेसवर हल्लाबोल
Follow us on

बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून कर्नाटकातील राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांचे कर्नाटक दौरे वाढल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच बेळगावमध्येही दौरे वाढल्याने आता राजकीय चर्चेना उधान आले आहे. ठाकरे गटाने मराठीचा मुद्दा घेतला आहे तर भाजपने हिंदू-मुस्लिम मुद्दा उपस्थित करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातच आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बेळगाव दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हणाले की, वर्षानूवर्षे या भागाचा विकास झाला नाही कारण नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील आमदार इथे निवडून येत आहेत.

त्यामुळे त्यांना भीती आहे की यामधून नरेंद्र मोदी लोकप्रिय होतील. त्यामुळे विकास हवा असेल तर भाजपला मतदान करा असे आवाहनही अमित शाह यांनी केले.

यावेळी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची भाजपने केलेली निवड आणि त्यावरुन त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, काँग्रेसने इतकी वर्षी राज्य केले पण आदिवासींचा कधी सन्मान केला नाही पण नरेंद्र मोदी यांनी आदिवासी भगिनीला राष्ट्रपती केले आणि आदिवासी समाजाचा सन्मान केला आहे.

त्याच बरोबर आदिवासीना एसटी आरक्षणामध्ये 3 टक्क्यावरून सात टक्क्यापर्यंत आरक्षण वाढवल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले.

अमित शाह यांनी काँग्रेसवर टीका करताना त्यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेसने वर्षानूवर्षे प्रभू रामाला कुलूप बंद ठेवले होते.

मात्र नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिर बनवण्याचा फक्त संकल्प केला नाही तर सुरवातही केली असं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदी यांचा गौरवही केला आहे. तर बजरंग दलावरूनही त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

काँग्रेसकडून आता बजरंग दलाचाही अपमान करत आहेत अशी टीका त्यांनी काँग्रेसवर आणि राहुल गांधी यांच्यावर केली आहे.

अमित शाह यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना म्हणाले की, राहुलबाबा आज येथे आले होते, मात्र कोरोना काळात हेच सांगत होते की, मोदींची लस आहे आणि ती घेऊ नका.

तर दुसरीकडे आपण मात्र रात्रीच्या अंधारात लस घेऊन आले होते असा टोलाहही त्यांनी राहुला गांधी यांना लगावला आहे. त्यामुळे कोरोना काळात राजकारण करणारे कधीही देशाचा विकास करू शकत नाहीत असा घणाघात त्यांनी काँग्रेसवर केला आहे.

यावेळी ते म्हणाले की, राहुलबाबा तुम्ही पाच घोषणा केल्या होत्या, मात्र त्याच घोषणा तुम्ही इतर राज्यात केल्या होत्या तिथं मात्र तुमचा पराभव झाला आहे अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यामुळे आताही बरं झालं तुम्ही हीच पाच अश्वासन इथे दिली आहेत, त्यामुळे इथंही तुमचा पराभव निश्चित आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

त्यामुळे ज्यांची स्वतःची गॅरेंटी नाही त्यांच्या गॅरेंटीवर मतदारांनी विश्वास ठेवायचा का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.