कर्नाटक : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला सोमवारी भीषण अपघात झाला (Shripad Naik Car Accident). यामध्ये नाईक यांना गंभीर दुखापत झाली. तसेच, त्यांच्या पत्नी विजया नाईक यांचा या अपघातात मृत्यू झाला. श्रीपाद नाईक यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते (Shripad Naik Car Accident).
उपचारानंतर श्रीपाद नाईक यांनी प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. पण, त्यांच्या पत्नीचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. श्रीपाद नाईक यांच्या गाडीत सहा जण असल्याची माहिती आहे.
उत्तर कन्नड जिल्ह्यातील येल्लापुरा येथे ही घटना घडलीय. उत्तरा कन्नड जिल्ह्यातील यल्लापुराजवळ केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांची गाडी पलटी झाली. नाईक हे त्यांच्या पत्नीबरोबर जात असताना ही दुर्घटना झाली. अपघातानंतर नाईक यांच्या पत्नी बेशुद्ध होत्या आणि त्या बराच वेळपर्यंत शुद्धीवर आल्या नाहीत. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
Prime Minister Narendra Modi has spoken to Goa Chief Minister Pramod Sawant to ensure proper arrangements for the treatment of Union Minister Shripad Naik, at Goa. https://t.co/txAQZm0Lz6
— ANI (@ANI) January 11, 2021
श्रीपाद नाईक यांना सध्या गोवा येथील रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलं आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा येथे श्रीपाद नाईक यांच्यावर योग्य उपचारासाठी होत आहेत की नाही हे सुनिश्चित करण्यासाठी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन करुन माहिती घेतली. नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना श्रीपाद नाईक यांच्या उपचारासाठी योग्य ती व्यवस्था करण्याच्या सूचनी दिल्या आहेत.
कर्नाटकातील अंकोला तालुक्यातील होसाकंबी गावातून जात असताना श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांची गाडी पलटल्याचे सांगितलं जात आहे. श्रीपाद नाईक यांच्यासह इतर तीन जण किरकोळ जखमी झालेत. हा अपघात किती भीषण होता या अंदाज श्रीपाद नाईक यांच्या गाडीवरुन येतो. अपघातानंतर नाईक यांच्या गाडीचा अक्षरश: चुराडा झाला आहे. अपघातानंतर त्यांची गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांमध्ये अडकल्याचं दिसून येतं (Shripad Naik Car Accident).
त्यांच्या गाडीचं वरचं छत पूर्णपणे दबलं गेलं आहे. तसेच, बोनटचा देखील चक्काचूर झाला आहे. त्यांच्या गाडीचा पूर्णपणे चेंदामेंदा झाल्यंचं दिसून येत आहे.
सध्या पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करत तपासाला सुरुवात केली आहे. श्रीपाद नाईक आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी आणि संरक्षण राज्यमंत्री आहेत.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात; पत्नीचा जागीच मृत्यू#shripadnaikhttps://t.co/l7FdT5SQTK
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 11, 2021
Shripad Naik Car Accident
संबंधित बातम्या :
Pune Accident | सोमवार की अपघातवार; पुण्यात एकापाठोपाठ चार अपघात