पणजी : भीषण अपघातात गंभीर जखमी झालेले केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक (Shripad Naik) यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. नाईक यांच्यावर गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार करण्यात आला. कर्नाटकातील गोकर्णला जाताना 11 जानेवारीला झालेल्या अपघातात नाईक जखमी झाले. या अपघातात त्यांच्या पत्नी आणि पीएला प्राण गमवावे लागले होते. (Union Minister Shripad Naik discharged from Goa Medical College after Car Accident)
जवळपास आठ दिवसांच्या उपचारानंतर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. दुर्घटनेत नाईक यांच्यासोबत गाडी असलेली पत्नी विजया नाईक आणि पर्सनल सेक्रेटरी यांचा मृत्यू झाला. श्रीपाद नाईक यांची प्रकृतीही गंभीर होती.
Union Minister Shripad Naik discharged from Goa Medical College. He had met with a road accident on January 11th while going from Yellapur to Gokarna in Karnataka.
The Minister’s wife and personal assistant passed away in the accident. pic.twitter.com/YriJTpI7Mh
— ANI (@ANI) January 19, 2021
श्रीपाद नाईक यांनी ज्या शॉर्टकटने जाण्याचा निर्णय घेतला होता, त्या रस्त्याची स्थिती अत्यंत वाईट होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी दोन वाहनांमध्ये धडक झालेली नव्हती, तर रस्ता खराब असल्यामुळे ड्रायव्हरचा कारवरील ताबा सुटला आणि गाडीला अपघातग्रस्त होऊन दरीत कोसळली. उत्तर कन्नड जिल्ह्यातील येल्लापुरात हा अपघात घडला होता. (Union Minister Shripad Naik discharged from Goa Medical College after Car Accident)
कर्नाटकातील अंकोला तालुक्यातील होसाकंबी गावातून जात असताना श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात झाला. अपघातात नाईक यांच्या गाडीचा अक्षरश: चुराडा झाला. अपघातानंतर त्यांची गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांमध्ये अडकल्याचं दिसत होतं. त्यांच्या गाडीचं छत पूर्णपणे दबलं गेलं होतं. तर बोनेटचाही चक्काचूर झाला होता. त्यांच्या गाडीचा पूर्णपणे चेंदामेंदा झाल्याचं दिसून आलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यात श्रीपाद नाईक यांच्यावर योग्य उपचारासाठी होत असल्याची खात्री करण्यासाठी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना श्रीपाद नाईक यांच्या उपचारासाठी योग्य ती व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
संबंधित बातम्या :
हायवेवरील शॉर्टकट जीवघेणा, अपघातात श्रीपाद नाईक अत्यवस्थ
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात; पत्नीचा जागीच मृत्यू
(Union Minister Shripad Naik discharged from Goa Medical College after Car Accident)