नवी दिल्ली: भारतातील धरणांविषयी धक्कादायक बाब संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून समोर आली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार 2025 पर्यंत भारतातील एक हजाराहून अधिक धरणे असतील जी 50 वर्षांपेक्षा जास्त जूनी असतील. या धरणांमुळे धरणाच्या खालील बाजूस राहणाऱ्या लोकांसाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो. 2050 पर्यंत जगातील बहुतांश लोकांचा रहिवास धरणांच्या जवळपास असेल. त्यामुळे 50 वर्षे आणि त्याहून अधिक वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या धरण धोकादायक ठरु शकतात, असा अंदाज अहवालात वर्तवण्यात आला आहे. (United Nations report claimed ageing dams in India will threat to peoples)
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार जगभरात 58700 मोठी धरणं आहेत जी 1930 ते 1970 दरम्यान बांधली गेलीत. या धरणांच्या बांधकामाला सरासरी 50 ते 100 वर्षे होत आली आहेत. धरणाचं बांधकाम केल्यानंतर 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर धरणाच्या भिंतीच्या मजबुतीबद्दल अडचणी निर्माण होतात. त्या दुरुस्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे खर्चे करावे लागतात. धरणात हळूहळू गाळ जास्त जमा होऊ लागतो.
संयुक्त राष्ट्रांचा अहवाल अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, जपान, भारत, झांबिया आणि झिम्बाब्वेमधील जुन्या धरणांवर आधारित आहे. विसाव्या शतकात धरण बांधल्यामुळे जगात मोठी क्रांती झाली होती. पण, आता ही धरणे जुनी झाली आहेत. जगातील एकूण 55 टक्के म्हणजेच 32,716 धरणे आशिया खंडातील चीन, भारत, जपान आणि दक्षिण कोरिया या चार देशांमध्ये आहेत. या चारही देशातील बहुतेक धरणे 50 वर्षे जुनी झाली आहेत. नेमकी ही परिस्थिती आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि पूर्व युरोपमधील धरणांची देखील आहे.
2025 पर्यंत भारतामध्ये 1115 मोठी धरणं असतील जी 50 वर्षे जुनी असतील. 2050 मध्ये ही संख्या वाढून 4,250 पोहोचेल. भारतात 2050 पर्यंत 64 मोठी धरणे अशी असतील जी 150 वर्षे जुनी होतील. केरळमध्ये मुल्लापेरियार धरण असे एक धरण आहे. हे धरण 100 वर्षांपूर्वी बांधले गेले. हे धरण फुटल्यास केरळ आणि तामिळनाडूला याचा फटका बसू शकतो. दोन्ही राज्यांमध्ये यावरुन वाद सुरु आहे.
अमेरिका आणि युरोपमधील धरणांबाबतही असाच धोका व्यक्त करण्यात आला आहे. जुन्या धरणांची दुरुस्ती किंवा सुधारणा करण्याचे काही आर्थिक व व्यावहारिक प्रश्न आहेत, ज्यामुळे ते थांबविण्यात आले आहेत. अमेरिकेत 90580 धरणं 56 वर्ष जूनी आहेत. 2020 मध्ये केलेल्या अभ्यासात 85 टक्के धरणांच्या पाणी साठवण क्षमेतवर परिणाम झाल्याचं दिसून आलं. अमेरिकेतील धरणे दुरुस्त करण्यासाठी अंदाजे खर्च 46 अब्ज डॉलर्स आहे. अमेरिकेच्या 21 राज्यांत गेल्या 30 वर्षात 1275 धरणे बंद झाली आहेत तर 2017 मध्ये 80 धरणांमध्ये पाणी साठवणं बंद करण्यात आले आहे.
महापुराचं संकट
भारतासारख्या मोसमी पावसाच्या प्रदेशात पावसाळ्यात महापूर येतात. पावसाळ्यात धरणांत मोठ्या प्रमाणात पाणी साठा असतो. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळते.
‘गळा कापून टाकेन, पण भाजपसमोर झुकणार नाही’, ममता बॅनर्जींचा घणाघात https://t.co/VwO9JFcTB0 @MamataOfficial @narendramodi @AmitShah @BJP4India #MamataBanerjee #NarendraModi #Kolkata #TMC
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 25, 2021
संबंधित बातम्या:
राष्ट्रपती भवनातील नेताजींच्या ‘त्या’ प्रतिमेवरुन वादंग; सुभाषचंद्र बोसांऐवजी अभिनेत्याचे चित्र?
अयोध्या येथील मशिदीला ‘या’ स्वातंत्र्य सेनानीचे नाव, लवकरच IICF घोषणा करणार
(United Nations report claimed ageing dams in India will threat to peoples)