OYO मध्ये अविवाहित जोडप्यांना No Entry..! कारण काय? ‘या’ शहरामध्ये नवा नियम लागू

| Updated on: Jan 06, 2025 | 11:41 AM

OYO Hotels New Rules : ओयोकडून हॉटेल्सच्या नियमावलीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आता अविवाहित जोडप्यांना हॉटेल्समध्ये चेक-इन करण्यास बंदी केली जाणार आहे. या नियमामुळे ओयोने त्यांची ओळख बदलण्याचा प्रयत्न केला आहे का?

OYO मध्ये अविवाहित जोडप्यांना No Entry..! कारण काय? या शहरामध्ये नवा नियम लागू
unmarried couples oyo
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

भारतामध्ये कोणत्याही शहरामध्ये चांगल्या दर्जाचे हॉटेल्स शोधण्यासाठी Oyo कंपनी लोकप्रिय मानली जाते. भारतात Oyo हॉटेल्सची सुरुवात 2013 मध्ये झाली होती. आजकाल Oyo हॉटेल्स लहान शहरांपासून ते मेट्रोपोलियन शहरांमध्ये पाहायला मिळतात. परंतु, आता Oyo या कंपनीनं त्यांच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. यापुढे अविवाहित जोडप्यांना Oyo हॉटेल्समध्ये एन्ट्री दिली जाणार नाही. आतापर्यंत अनेक अविवाहित जोडप्यांना पटकन रुम बुक करता येत होतं. मात्र आता नव्या नियमांमुळे या गोष्टीवर बंदी घालण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशमधील मेरठ शहरामधून हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. यानंतर हा नियम संपूर्ण देशात लागू केला जाणार आहे. परंतु, Oyo कंपनीने हे पाऊल नेमकं कोणत्या करणांमुळे उचलले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. Oyo च्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर देखील अनेक मिम्स व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. सादग नियमांमध्ये केलेल्या बदलामुळे Oyo स्वत:ची ओळख बदलण्याचा प्रयत्न करतोय का? असा प्रश्न उपस्थित होतो.

कंपनी नेमकं काय म्हणाली?

Oyo कंपनीचे उत्तर भारत क्षेत्राचे प्रमुख पावस शर्मा म्हणाले की, लोकांना जबाबदार आमि सुरक्षित आदरतिथ्याची सेवा देण्यास Oyo कटिबद्ध आहे. आम्ही लोकांच्या वयैक्तिक स्वातंत्राचा आदर करतो. परंतु, ज्या प्रदेशामध्ये आमचा व्यावसाय सुरु आहे, त्या प्रदेशातील कायद्याचे पालन करणे आणि नगरी संघटनांना सहकार्य करणे ही देखील आमची जबाबदारी आहे. या बदलानंतर देखील आमची कंपनी वेळोवेळी या धोरणांचा आमि त्यांच्या परिणामांचा आढावा घेणार आहेत.

लग्नाचा पुरावा द्यावा लागणार

पीटिआयच्या रिपोर्टनुसार, Oyo ने अविवाहित जोडप्यांना हॉटेल बुकिंवर सरसकट बंदी आणली आहे. जर तु्म्हाला या पुढे Oyo हॉटेलमध्ये बुकिंग करायची असेल तर तुम्हाला तुमच्या लग्नाचा पुरावा द्यावा लागेल. हा सादर नियम सध्या ऑनलाईन बुकिंगसाठी लागू करण्यात आला आहे. सादर नियमावली तात्काळ लागू करावी, असे निर्देश Oyo कंपनीने मेरठमधील सगळ्या हॉटेल्सना दिले आहेत.

ओळख बदलण्यासाठी

Oyo कंपनीने त्यांची ओळख बदलण्याचा प्रयत्न केला आहे असे सांगण्यात येत आहे. या नियमांच्या माध्यमातून Oyo हॉटेल्स कुटुंब, व्यावसायीक प्रवासी, विद्यार्थी आणि एकटे प्रवास करणाऱ्या वयक्तींच्या सुरक्षेच्या दृष्टीने विचार करत आहे असे पाह्यला मिळते. या बदलांमुळे ग्राहकांनी Oyo मध्ये अधिक दिवस राहावे आणि पुन्हा बुकिंग करावे असा Oyo कढून प्रयत्न केला जाईल.