40 वर्षापासून मौन, अन्नाचा एक कणही खाल्ला नाही… व्हाट्सअपवरून UPSC ची ट्रेनिंग; कोण आहेत चायवाले बाबा?

| Updated on: Jan 10, 2025 | 12:54 PM

प्रतापगडचे चायवाले बाबा, दिनेश स्वरूप ब्रह्मचारी, गेल्या 40 वर्षांपासून यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. ते मौनव्रतावर आहेत आणि केवळ इशाऱ्यांनी आणि व्हाट्सअपद्वारे मार्गदर्शन करतात. प्रयागराज कुंभमेळ्यात त्यांची प्रचंड चर्चा आहे. त्यांच्या अद्वितीय मार्गदर्शनाने विद्यार्थी यूपीएससीमध्ये यशस्वी होत आहेत.

40 वर्षापासून मौन, अन्नाचा एक कणही खाल्ला नाही... व्हाट्सअपवरून UPSC ची ट्रेनिंग; कोण आहेत चायवाले बाबा?
Chai wale Baba
Follow us on

उत्तर प्रदेशातील प्रतापगडमध्ये चायवाले बाबा नावाच्या प्रख्यात बाबाची प्रयागराजच्या कुंभ मेळ्यात प्रचंड चर्चा सुरू आहे. हे बाबा पूर्वी चहा विकायचं काम करायचे. दिनेश स्वरुप ब्रह्मचारी असं त्यांचं नाव. गेल्या 40 वर्षापासून ते सिव्हिल सर्व्हिसमधील (यूपीएससी) विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांना शिकवत आहेत. काहीच न खाता, पिता ते आपलं जीवन व्यतीत करतात. फक्त रोज दहा कप चहा घेतात. मौन ठेवतात. विद्यार्थ्यांना केवळ इशाऱ्याने आणि व्हाटसअपद्वारे मार्गदर्शन करतात, शिकवतात.

यूपीएससीचा विद्यार्थी राजेश सिंह यांनी सांगितलं की, महाराज आम्हाला गेल्या अनेक वर्षांपासून मार्गदर्शन करतात. ते मौनात असूनही आम्हाला लिखित नोट्स इशाऱ्यांनी समजावतात. चायवाल्या या बाबाचं ज्ञान शब्दांच्याही पलिकडचं आहे. बाबांच्या बाबत ऐकून केवळ भारतीयच नव्हे तर विदेशातील लोकही आश्चर्यचकीत होत आहेत. त्यांच्या या भावाला नमन करत आहेत.

म्हणून मौन

बाबा विद्यार्थ्यांना मुफ्त कोचिंग आणि अभ्यासाची सामुग्री देत आहेत. व्हॉट्सअपवर विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरं देत आहेत. आपली एनर्जी वाचवण्यासाठी बाबांनी मौनव्रत धारण केलं आहे. ही एनर्जी ते ज्ञानार्जन करण्यात आणि लोकांमध्ये वाटण्यात घालवत आहेत. त्यांचा उद्देश अधिकाधिक लोकांचं भलं करणं हे आहे, असं विद्यार्थी सांगतात.

40 वर्षांपासून मौन

प्रयागराज मेळाव्यात आलेल्या लोकांना जेव्हा चायवाल्या बाबांबद्दल माहिती मिळते तेव्हा तेही या बाबांचे फॅन्स होत आहेत. या बाबाने जेवण न करण्याचा आणि मौन राहण्याचं व्रत अंगिकारलं आहे. गेल्या 40 वर्षात त्यांनी अन्नाचा एकही कण खाल्लेला नाही. एकही शब्द उच्चारला नाही. फक्त रोज 10 कप चहाच ते पितात. याशिवाय यूपीएससीच्या एसपिरेंट्सला गाइडही करत आहेत.

कुंभमेळा कधी आहे?

महाकुंभ 12 वर्षानंतर येतो. यावेळी 45 कोटीहून अधिक भक्त कुंभमध्ये सामील होणार आहेत. गंगा, जमुना आणि सरस्वती नदीच्या संगमावर हा महासोहळा पार पडणार आहे. 12 जानेवारीपासून महाकुंभला सुरुवात होणार आहे. तर मकर संक्राती, मौनी अमावस्या आणि वसंत पंचमीला होणारं शाही स्नान हे मुख्य आकर्षण असणार आहे.