UPSC CMS Final Result 2020 नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (UPSC ) घेण्यात आलेल्या कंबाइंड मेडिकल सर्व्हिसेस परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. कंबाइंड मेडिकल सर्व्हिसेस परीक्षेमधून 559 पदांवर भरती होणार आहे. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी यूपीएससीची ऑफिशियल वेबसाईट upsc.gov.in वर भेट द्यावी आणि निकाल पाहावा. (UPSC CMS Final Result 2020 declared check at upsc.gov.in with direct link)
कंबाइंड मेडिकल सर्व्हिसेस परीक्षा 2020 साठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 29 जुलै 2020 ला सुरु झाली होती. तर परीक्षा 22 ऑक्टोबर 2020 ला झाली होती. या परीक्षेचा निकाल 12 नोव्हेंबरला घोषित करण्यात आला होता. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमदेवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात आले होते. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदावारांच्या मुलाखती 18 जानेवारी 2021 ला झाल्या होत्या. निवड झालेल्या उमेदवारांचा निकाल यूपीएससीच्या वेबसाईटवर जारी करण्यात आला आहे,
UPSC CMS Final Result 2020 थेट निकाल पाहण्यासाठी क्लिक करा
यूपीएससीतर्फे केंद्रीय आरोग्य सेवेतील विविध पदांसाठी आणि रेल्वेमधील सहायक विभागीय वैद्यकीय अधिकारी, सहायक वैद्यकीय अधिकारी ऑर्डीनन्स फॅक्टरी, नवी दिल्ली महानगरपालिकेतील जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर, पूर्व, उत्तर आणि दक्षिण दिल्ली महापालिकेच्या जनरल ड्युटी महापालिका पदासाठी निवड करण्यात येणार आहे.
UPSC CMS परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची येत्या काही दिवसांमध्ये पडताळणी करण्यात येणार आहे. निकाल जाहीर झाल्यापासून सहा महिन्याच्या कालावधीमध्ये उमेदवारांना कागदपत्रांची पडताळणी करुन घ्यावी लागेल, अन्यथा त्यांना अपात्र ठरवले जाईल. याबाबत अधिक माहिती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर लवकरच जाहीर करण्यात येईल.
IPL 2021 : “मुंबईला हरवणं मुश्किल ही नहीं नामुमकीन”https://t.co/yQLS2pEkpT#MI #MumbaiIndians #SunilGavaskar #RohitSharma
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 30, 2021
संबंधित बातम्या
(UPSC CMS Final Result 2020 declared check at upsc.gov.in with direct link)