देशातील सर्वात अवघड परीक्षांपैकी एक असलेल्या युपीएससीच्या प्राथमिक परीक्षेचा अखेर लागला आहे. त्यामुळे या परीक्षेला बसलेल्या सर्व उमेदवारांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन प्राथमिक परीक्षेचा निकाल पाहाता येणार आहे. देशभरातील लाखो मुले या परीक्षेला बसतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाने ( UPSC ) आज ( सोमवारी 1 जुलै ) नागरी सेवा ( प्राथमिक ) परीक्षा 2024 चा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेत बसलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन आपला निकाल पाहू शकणार आहेत.
जे उमेदवार सिव्हील सेवा प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. ते आता पुढील महत्वाच्या युपीएससी सीएसई मुख्य परीक्षा 2024 ला बसण्यास पात्र झाले आहेत. या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांना मुलाखती आणि व्यक्तीत्व चाचणी परीक्षाला निवडले जाणार आहेत. या युपीएससी परीक्षेच्या नियमानूसार आता सर्व उमेदवारांना सिव्हील सेवा ( मुख्य ) परीक्षा 2024 साठी पुन्हा सविस्तर अर्ज पत्र -1 ( DAF -1 ) करावा लागणार आहे.
UPSC ची प्राथमिक परीक्षा 16 जून रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. या नागरी सेवा ( प्राथमिक ) परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रकाराचे दोन पेपर होते ( ( बहुपर्यायी प्रश्न ) आणि जास्तीत जास्त 400 गुण होते. UPSC नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर-II मधील किमान 33% पात्रता गुण आणि नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर-I मधील एकूण पात्रता गुणांनूसार उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. नागरी सेवा ( मुख्य ) परीक्षा परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. यामध्ये भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि भारतीय विदेश सेवा (IFS) यांचा समावेश आहे. एकूण रिक्त पदांपैकी 40 पदे अपंगत्व श्रेणीतील व्यक्तींसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहेत.
पायरी 1 : सर्वप्रथम UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा.
पायरी 2 : आता मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या UPSC नागरी सेवा ( प्राथमिक ) निकाल 2024 लिंकवर क्लिक करा.
पायरी 3 : आता एक नवीन पृष्ठ उघडेल जिथे उमेदवारांना आवश्यक तपशील टाकावे लागतील.
पायरी 4 : आता सबमिट पर्यायावर क्लिक करताच निकाल तुम्हाला दिसेल
पायरी 5 : निकाल तपासा आणि निकालाचे प्रिंटआऊट काढून त्याची हार्ड कॉपी स्वत:जवळ बाळगा