नई दिल्ली – जम्मू – कश्मीर येथील देशातील महत्वपूर्ण रेल्वे प्रोजेक्टचे काम सुरु आहे. जम्मूला श्रीनगरला जोडण्यासाठी तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी या रेल्वे मार्गाचे भूमिपूजन केले होते. उधमपुर-श्रीनगर-बारामूला रेल्वे लिंक ( USBRL ) जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. जगातील सर्वात उंच रेल्वे पुल कश्मीरातील चिनाब नदीवर बांधून पूर्ण झाला आहे. हा रेल्वे ब्रिज ( Chenab Rail Bridge ) कश्मीरात तयार झाला आहे. लवकरच या मार्गावर ट्रेन सुरु होणार आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी चिनाब रेल्वे पुलावरील तपासणी ट्रेन चालविण्यात आली त्याचा सुंदर व्हीडीओ शेयर केला आहे.
अश्विनी वैष्णव यांनी एक्सवर ट्रायल रनचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यावर त्यांनी पोस्ट टाकत लिहीले की ‘संगलदान ते रियासी पर्यंत आज पहली ट्रायल ट्रेन यशस्वीपणे चालविण्यात आली. यात जगातील सर्वात उंच पुल चिनाब ब्रिजला पार करणे देखील सामील होते. यूएसबीआरएल मार्गाचे जवळपास सर्व कामे पूर्ण झाली आहेत. केवळ टनेल क्रमांक – 1 ची काही जुजबी कामे शिल्लक आहेत.
उधमपुरा श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्प या वर्ष अखेरीस पूर्ण होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 20 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. चिनाब रेल्वे पूल चिनाब नदीच्यावर सुमारे 359 मीटर उंचीवर बांधला आहे.
रेल्वे मंत्र्यांनी शेअर केलेला VIDEO –
1st trial train between Sangaldan to Reasi. pic.twitter.com/nPozXzz8HM
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) June 16, 2024
जम्मू-काश्मीरमध्ये बांधण्यात आलेला जगातील सर्वात उंच रेल्वे पूल चिनाब नदीच्या सुमारे 359 मीटर उंचीवर बांधला गेला आहे. चिनाब रेल्वे पुलाच्या बांधकामात एकूण 30,000 मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. हा पूल 1486 कोटी रुपये खर्च करुन बांधला आहे. हा पुल एक इंजिनियरींग चमत्कार असून ताशी 260 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा देखील हा पुल सामना करू शकतो. हा पूल उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पांतर्गत बांधण्यात आला आहे.
सुरुवातीला बारामुल्ला ते बानीहाल असा रेल्वे मार्ग सुरु झाला होता. नुकताच संगलदान या स्थानकापर्यंत वीजेवरील ट्रेन सुरु झाली आहे. 15,863 कोटी खर्चून बानीहाल ते संगनदान दरम्यान रेल्वे ट्रॅक बांधला आहे. या रेल्वे मार्गाची लांबी सुमारे 48.1 किलोमीटर आहे. साल 2010 मध्ये हे काम सुरु झाले होते आणि 14 वर्षांनी ते पूर्ण झाले आहे. या मार्गावर 11 टनेल आणि 16 पुल आहेत. 48 किमीपैकी 43 किमीचा भाग बोगद्यातून जात असल्याने या ट्रेनमध्ये आपण रात्रीचा प्रवास करतो की काय असा भास होतो. या मार्गावरील सर्वात मोठ्या टी – 50 बोगद्याची लांबी तब्बल 12.77 किलोमीटर आहे. हा भारतातील सर्वात मोठा रेल्वे टनेल आहे. हा बोगदा खरी-सुंबेर सेक्शनचाच भाग आहे. बारामुल्ला ते संगलदान दरम्यान रेल्वे सुरु झाली आहे. ही गाडी बनिहाल मार्गे धावते.