Video : आरिफ आणि सारस एकमेकांसमोर आल्यावर जे झालं ते पाहून तुमचेही डोळे पाणावतील!

| Updated on: Apr 11, 2023 | 11:17 PM

प्राणी मुके असले तरी त्यांनी एकदा जीव लावला की ते मरेपर्यंत विसरत नाहीत. अशाच प्रकारे आरिफला पाहिल्यावर सारस ज्या प्रकारे उड्या मारत होता हा भावनिक क्षण कोणाच्याही डोळ्यात पाणी आणेल.

Video : आरिफ आणि सारस एकमेकांसमोर आल्यावर जे झालं ते पाहून तुमचेही डोळे पाणावतील!
Follow us on

लखनऊ : आरिफ आणि सारस यांच्या मैत्रीची सर्वत्र चर्चा आहे. दोघेही किती जिगरी आहेत हे सर्वांना माहितच आहे. वनविभागाने नियमानुसार सारसला कानपूरच्या प्राणी संग्रहालयात आणण्यात आलं. त्यावेळी आरिफ त्याला भेटण्यासाठी गेल्यावर त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. प्राणी मुके असले तरी त्यांनी एकदा जीव लावला की ते मरेपर्यंत विसरत नाहीत. अशाच प्रकारे आरिफला पाहिल्यावर सारस ज्या प्रकारे उड्या मारत होता हा भावनिक क्षण कोणाच्याही डोळ्यात पाणी आणेल.

दोघांचं नेमकं काय कनेक्शन?

अमेठी जिल्ह्यामधील जामो विकास गटातील मांडखा येथील रहिवासी असलेल्या आरिफला सुमारे एक वर्षापूर्वी शेतात किरकोळ जखमी अवस्थेत सापडला होता. आरिफने त्याला आपल्या घरी नेलं आणि दवाखान्यामध्ये रूग्णांची जशी काळजी घेतात तशा प्रकारे त्याची देखरेख केली. काही दिवसांनी सारस ठिक झाला आणि दोघांची मैत्री इतकी घट्ट झाल होती की त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

 

व्हायरल व्हिडीओ पाहून समाजवादी पक्षाचे (एसपी) राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सारस यांची भेट घेतली तेव्हा वनविभागाच्या टीमला सारसची माहिती मिळाली. वनविभागाच्या पथकाने सारस प्राणीसंग्रहालयात नेलं. त्यावेळी सर्वांना आरिफ आणि सारस यांच्यातील मैत्रीबद्दल माहिती झाली.

आरिफ प्राणी संग्रहालयात त्याला भेटायला गेल्यावर त्याचा आवाज ऐकताचा तो अस्वस्थ झालेला दिसला. सारसची त्याच्याकडे जाण्याची धडपड सर्वांना दिसत होती. विशेष म्हणजे आरिफने त्याला उडायला सांगितल्यावर तो त्याला ठेवण्यात आलेल्या ठिकाणी उडू लागला. सारसला आपला मित्र पाहिल्यावर काही भान नव्हतं राहिलं.

दरम्या, एकवेळ माणूस केलेली मदत विसरेल मात्र प्राणी नाही, आरिफ आणि सारस यांच्या मैत्री हे जिवंत उदाहरण आहे. दोघांच्या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.