योगी आदित्यनाथ यांनी अब्बाजान म्हणत आधीच्या सरकारांवर टीका केलीय
लखनऊ : देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रेटी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता त्यात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाचाही समावेश झाला आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. (Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath Tested Corona Positive)
योगी आदित्यनाथ यांचे ट्वीट
मला काही दिवसांपासून कोरोनाचे लक्षण दिसत होती. त्यानंतर मी चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मी विलीगकरणात आहेत. तसेच डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करत आहे. तसेच माझी सर्व काम ऑनलाईन करत आहेत. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.
योगी आदित्यनाथ यांनी मंगळवार (13 एप्रिल) पासून आयसोलेट झाले होते. तेव्हापासूनच ते सर्व कामकाज ऑनलाईन किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून करत होते. तसेच कोरोनाचा आढावा घेण्यासाठी होणाऱ्या बैठकीला त्यांनी ऑनलाईन संबोधित केले होते.
काही दिवसांपूर्वी विलगीकरणात
दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांच्या कार्यालयातील एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. योगी आदित्यनाथ त्यांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्यांनी स्वत:ला विलग करुन घेतले होते. यानंतर त्यांना लक्षण जाणवू लागल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. ही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
अखिलेश यादव यांनाही कोरोनाची लागण
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेख यादव यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अखिलेख यादव यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. नुकतंच माझ्या कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी घरीच विलगीकरणात उपचार घेत आहे, असे ट्वीट अखिलेश यादव यांनी केले आहे. (Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath Tested Corona Positive)
संबंधित बातम्या :
CBSE Exam: नरेंद्र मोदींची सीबीएसई बोर्ड परीक्षेसंदर्भात महत्वाची बैठक, मोठा निर्णय होणार?
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विलगीकरणात, योगींच्या कार्यालयातील अनेक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
Coronavirus News: शरीरातील ‘या’ नव्या जागेत लपून बसलाय कोरोना; RT-PCR चाचणीतही सापडत नाही