नवी दिल्लीः उत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथील जिल्हा रुग्णालयाच्या व्यवस्था आणि जबाबदार लोकांकडून माणुसकीलाही लाजवेल अशी घटना घडली आहे. रुग्णालयातील डॉक्टर आणि उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाची एक घटना घडली आहे. एका अपघाताताली जखमीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्या रुग्णाला इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले मात्र त्या रुग्णाला अक्षरशः फरशीवर झोपवण्यात आले होते. त्याही पुढे जाऊन त्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये भटक्या कुत्रा घुसला, आणि रक्तबंबाळ रुग्णाचे तो कुत्रा रक्त चाटत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
एका अपघातातील जखमीला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याला कॉटवर न झोपवता त्याला फरशीवरच झोपवण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या शरीरातून रक्त वाहत होते.
त्यावेळी एका भटक्या कुत्र्याने इमर्जन्सी वॉर्डमध्ये घुसल्यानंतर त्या जखमीचं रक्त चाटत बसला होता. घटनेचा व्हिडीओ आता प्रचंड व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे या रुग्णालयाच्या प्रशासनावर टीका होत आहे.
असं म्हटलं जात आहे की, रात्रीच्या वेळी या रुग्णालयामध्ये डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचारी मिळतील न मिळतील पण रुग्णालयाच्या वॉर्डमधून मात्र भटक्या कुत्र्यांचा वावर नेहमीच असतो असं सांगण्यात आले आहे.
अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर रुग्णाला दाखल करुन झाल्यानंतरही त्या रुग्णालयामध्ये एकही डॉक्टर, नर्स उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आहे.
रुग्णाला दाखल केल्यानंतर त्याला कॉटवर न झोपवता त्याला खालीच फरशीवर झोपवण्यात आले होते. त्यामुळे या घटनेबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे तर दुसरीकडे उपचार वेळेवर मिळाले नसल्याने जखमीचीअवस्था नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे.
उत्तर प्रदेशात एकीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सरकार आरोग्य व्यवस्था हायटेक करण्याचा प्रयत्न करते आहे. तर दुसरीकडे रुग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्यांकडून मात्र आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा करण्यात घुंतले असल्याची टीका होऊ लागली आहे.
सरकारी रुग्णालयांची ओपीडी सकाळी आठ वाजता सुरू करण्याचे आदेश आहेत मात्र येथील आरोग्य अधिकारी अकरा वाजले तरी रुग्णालयात उपस्थित नसतात, त्यामुळे आजाराची समस्या कुणाला सांगायची असा सवाल आता येथील नागरिक करु लागले आहे.