माझा नवरा नामर्द, नव्या नवरीचा गंभीर आरोप, पोलिसांची एन्ट्री आणि मग…

| Updated on: Dec 26, 2023 | 12:30 PM

तेथे एका नवविवाहीत वधूने तिच्या पतीविरोधात तक्रार करत त्याच्यावर गंभीर आरोप लावले. 'माझा नवरा नामर्द आहे'. त्याचा हा आजार लपवून माझं त्याच्याशी लग्न लावून देण्यात आलं, असा आरोप तिने केला.

माझा नवरा नामर्द, नव्या नवरीचा गंभीर आरोप, पोलिसांची एन्ट्री आणि मग...
Follow us on

लखनऊ | 26 डिसेंबर 2023 : लग्न म्हटलं की नव्या आयुष्याची सुरूवात असते. वर आणि वधू दोघांनीही एकमेकांसोबत जगण्याची, आयुष्याची कितीतरी स्वप्न पाहिलेली असतात. पण काहीवेळा असं काही होतं, ज्याने सगळी स्वप्न विखुरतात आणि हातात उरतो तो फक्त अपेक्षाभंग.. अशीच एक धक्कादायक गोष्ट बांदामध्ये उघडकीस आली. तेथे एका नवविवाहीत वधूने तिच्या पतीविरोधात तक्रार करत त्याच्यावर गंभीर आरोप लावले. ‘माझा नवरा नामर्द आहे’. त्याचा हा आजार लपवून माझं त्याच्याशी लग्न लावून देण्यात आलं. एवढंच नव्हे तर सासरचे लोकही हुंड्यासाठी माझा अनन्वित छळ करतात, असा आरोपही तिने लावला. याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांची एंट्री झाली. त्यांनी चार डॉक्टर्स आणि एका लॅब टेक्विशियनचे पॅनेल नेमून त्यांच्याद्वारे वैद्यकीय तपासणी करून घेतली.

सहा महिन्यांपूर्वीच झाला विवाह

तिंदवारी येथील एका 31 वर्षीय तरुणीचे सहा महिन्यांपूर्वी हमीरपूर जिल्ह्यातील सुमेरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात लग्न झाले होते. पण गेल्या तीन महिन्यांपासून ती नवविवाहित महिला तिच्या माहेरीच राहत होती. पती आणि सासरचे लोकं हुंड्यासाठी छळ करत असल्याची तक्रार तिने तिंदवारी पोलिस ठाण्यात दिली होती. आम्ही त्यांच्या मागण्या पूर्ण करू शकलो नाही, तेव्हा त्यांनी मला बेदम मारहाण केली. तसेच माझा नवरा नामर्द आहे, हे सत्यही लग्नाच्या वेळी माझ्यापासून लपवून ठेवण्यात आले, असे त्या महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले.

पोलिसांनी दाखल केला गुन्हा

पीडित महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पीडितेचा पती आणि तिच्या सासरच्या इतर लोकांविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला. शनिवारी पोलिसांनी आरोपी पतीची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. येथे, पाच सदस्यांच्या पॅनेलमध्ये डॉ. विनीत सचान, डॉ. हदेश पटेल, डॉ. हरदयाल, डॉ. अंकित आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ रामलखन चौरसिया यांनी पतीचे वीर्य आणि मानसिक स्थिती तपासली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या अंतर्गत पतीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तपासाच्या आधारे आरोपींवर कारवाई केली जाईल, असे तिंदवारी पोलिस ठाण्याचे प्रभारी कौशल सिंह यांनी सांगितले.