नवी दिल्लीः उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये एका दलित मुलीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे ट्विट करून न्याय मागितला आहे. त्यामध्ये पीडितेने आरोप केला आहे की, तिच्याबरोबर एका मुस्लिम तरुणाने नाव बदलून मैत्री केली होती. त्यानंतर त्यांच्या मैत्रीतून त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर त्याने तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेऊन त्याचा व्हिडीओही तयार केला होता. आणि तो व्हायरल करण्याची धमकी देत होता.
या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करुनही अजून त्याच्यावर कारवाई केली गेली नसल्याचे दलित मुलीने म्हटले आहे. त्यामुळे तिने आता थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ट्विट करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ऑनलाईन तक्रार केल्यानंतर मात्र पोलिसांनी आता त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पीडितेने मुस्लिम तरुणाने आधी मुलीबरोबर आपले नाव बदलून तिच्याबरोबर मैत्री केली. त्यानंतर दोघांचा व्हिडीओ बनवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबळी करत होता. त्यानंतर पीडितेने त्याला विरोध केला असता आरोपीकडून मुलीला मारहाणही करण्यात आली आहे.
त्यामुळे त्या मुलीने व्हिडीओ शेअर केला असून या घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांनाही देण्यात आली आहे. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर आरोपी जुनैदने तिचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
ज्या मुलीवर अन्याय अत्याचार झाला आहे त्या मुलीने तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी विशेषत: हिंदू मुलींना फसवून त्यांचा धर्म बदलण्यास सांगितले जाते.
त्यांचे ऐकले गेले नसेल तर त्यांना मारहाण केली जाते. त्यांच्या धर्मांतराच्या या मिशनमुळे त्या मुलाला आता 2 रुपये मिळतात असंही त्या मुलीने सांगितले आहे.