Tomato Rate : टॉमॅटो महाग वाटत असतील तर खाणं बंद करा, नाहीतर कुंडीत लावा!; भाजपच्या मंत्र्याचा अजब सल्ला

| Updated on: Jul 23, 2023 | 9:52 AM

Tomato Rate : टॉमॅटोचे भाव गगनाला भिडलेत. त्यामुळे सर्वसामन्यांच्या खिशाला त्याची झळ पोहोचलीये. त्यामुळे या महागाईच्या भडक्याविरोधात सर्वसामान्य जनता संताप व्यक्त करत आहे. आज मुंबईत 130 रुपये किलो टोमॅटो मिळतो आहे. अशात टॉमॅटोसाठी एवढे पैसे मोजणं शक्य होत नाही. हे भाव लवकरात लवकर पूर्ववत व्हावेत, अशी भावना सर्वसामान्य लोक व्यक्त करत आहेत. अशातच एका मंत्र्यांच्या […]

Tomato Rate : टॉमॅटो महाग वाटत असतील तर खाणं बंद करा, नाहीतर कुंडीत लावा!; भाजपच्या मंत्र्याचा अजब सल्ला
Image Credit source: PTI
Follow us on

Tomato Rate : टॉमॅटोचे भाव गगनाला भिडलेत. त्यामुळे सर्वसामन्यांच्या खिशाला त्याची झळ पोहोचलीये. त्यामुळे या महागाईच्या भडक्याविरोधात सर्वसामान्य जनता संताप व्यक्त करत आहे. आज मुंबईत 130 रुपये किलो टोमॅटो मिळतो आहे. अशात टॉमॅटोसाठी एवढे पैसे मोजणं शक्य होत नाही. हे भाव लवकरात लवकर पूर्ववत व्हावेत, अशी भावना सर्वसामान्य लोक व्यक्त करत आहेत. अशातच एका मंत्र्यांच्या अजब विधानाने आश्चर्य व्यक्त होतंय.

उत्तर प्रदेशमधील भाजपच्या नेत्या, योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील मंत्री प्रतिभा शुक्ला यांनी अजब विधान केलंय. त्यांच्या या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॉमॅटोचे दर सध्या गगनाला भिडलेत. अशात या भाववाढीवर तुमची काय प्रतिक्रिया आहे. तुम्ही लोकांना काय सांगाल? महिला म्हणून या विषयाकडे कसं पाहता?, असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी उत्तर दिलं.

सगळ्यात आधी तर लोकांना मी सांगेन की तुम्ही घरात कुंडीत टॉमॅटो लावा. खूप साऱ्या वस्तू या महाग झाल्या आहेत. तर त्यांना खाणं सोडून द्या. जेणे करून त्या वस्तू स्वस्त होतील, असं अजब वक्तव्य मंत्री प्रतिभा शुक्ला यांनी केलं आहे.

महागाई काही नवीन नाहीये. टोमॅटो नेहमीच महाग असतो. या मौसमच तसा आहे. दरवर्षी या काळात टोमॅटो महान होतो. टोमॅटो महाग होणं काही नवीन नाही. लहानपणापासून आपण पाहातो आहोत. की टोमॅटो महाग होतो. लोकांना एवढंच सांगेन की तुम्ही वाटिका तयार करा किंवा कुंडीत टोमॅटो लावा, असं त्या म्हणाल्या आहेत.

वृक्षारोपणाअंतर्गत टोमॅटो लावा. काय प्रॉब्लेम आहे? असं टोमॅटो लावायला. टोमॅटो महान वाटत असतील तर खावू नका. तुम्ही खाणं बंद केलं की आपोआप त्याचे भाव कमी होतील, असं प्रतिभा शुक्ला यांनी म्हटलं आहे.

आमच्या कडच्या एका गावात एक पोषण वाटीका बनवण्यात आली आहे. गावातील महिला गावाबाहेर एका ठिकाणी कचरा गोळा करतात. त्या ठिकाणी त्या महिला काही भाज्या लावतात. त्या ठिकाणी त्यांनी टॉमॅटो, भोपळा या सारख्या भाज्या लावल्या आहेत. या महिलांनी छोटीशी वाटिका बनवली आहे. तर या महिलांना भाजी घ्यायला बाहेर जावं लागत नाही. त्या या वाटिकेतून भाज्या घेतात आणि घरात जाऊन त्याची भाजी बनवतात. तसंच इतरांनीही करावं, असं प्रतिभा शुक्ला म्हणाल्या आहेत.

प्रतिभा शुक्ला यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर टीका केली आहे. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही असं बोलणं शोभत नाही. जबाबदारीनं वक्तव्य करा, असं नेटकरी म्हणत आहेत.