संभल : विविध कारनाम्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे यूपी पोलीस सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. संभल जिल्ह्यातील एका गर्भवती महिलेसाठी यूपी पोलीस देवदूत ठरले आहेत. पत्नीला रुग्णालयात मच्छर चावत असल्याने एका तरुणाने यूपी पोलिसांना ट्विट केले. यानंतर काही वेळातच यूपी पोलीस मच्छरचा नाईनाट करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. मच्छरपासून बचाव करण्यासाठी काही साहित्य त्यांनी संबंधित तरुणाला दिले.
चंदौसी कोतवाली भागातील राज मोहल्ला येथे राहणाऱ्या असद खानने आपल्या गर्भवती पत्नीला वेदना होत असल्याने तिला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. पत्नीची प्रसुती होऊन तिला मुलगी झाली. मध्यरात्री महिलेला मच्छरचा भयंकर त्रास होऊ लागला. यानंतर पतीने यूपी पोलिसांचे 112 आणि संभल पोलिसांना ट्विट करुन आपबीती सांगितली.
‘माफिया से लेकर मच्छर तक का निदान’ –
नर्सिंग होम में अपने नवजात शिशु और प्रसूता पत्नी को मच्छरों से राहत देने के लिये एक व्यक्ति द्वारा ट्वीट कर मदद की अपील की गयी। #UP112 PRV 3955 ने त्वरित कार्यवाही कर नर्सिंग होम में मॉस्किटो क्वॉइल पहुँचाया।#UPPCares@sambhalpolice pic.twitter.com/WTrK7o8bhY
— UP POLICE (@Uppolice) March 20, 2023
‘माझ्या पत्नीने चंदौसी येथील हरी प्रकाश नर्सिंग होममध्ये एका छोट्या परीला जन्म दिला आहे. पण माझ्या पत्नीला इथे वेदना होत आहेत. बरेच डासही चावत आहेत. कृपया मला ताबडतोब मार्टिन कॉइल प्रदान करा’, असे तरुणाने ट्विट करत पोलिसांना सांगितले. यानंतर तरुणाला यूपी पोलिसांच्या 112 च्या ट्विटर अकाऊंटवरून उत्तर देण्यात आले आणि काही वेळातच संभल जिल्ह्यातील डायल 112 ची PRV 3955 मॉर्टिन कॉइलसह रुग्णालयात पोहोचली.
यानंतर पोलिसांनी डासांपासून सुटका करण्यासाठी मॉर्टिन कॉइल असद खान याच्याकडे सोपवली. यानंतर तरुणाने संभल पोलिसांचे मनापासून आभार मानले. तरुणाने पुन्हा एकदा या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन मार्टिन कॉईल उपलब्ध करून दिल्याबद्दल 112 चे आभार मानले आहेत.
मध्यरात्री यूपी पोलिसांकडून ट्विट करून डासांपासून सुटका करण्यात मदत करणाऱ्या तरुणाने यूपी पोलीस आणि संभल पोलिसांचे आभार मानले. त्यानंतर मिळालेल्या समाधानकारक उत्तरानंतर आता यूपी पोलिसांनीही एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये लिहिले आहे,’माफियापासून डासांपर्यंत निदान…’